वडजाईत वीज तार चोरीचे सत्र सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 12:34 IST2019-12-06T12:33:33+5:302019-12-06T12:34:13+5:30
शेतकऱ्यांकडून चोरांचा पाठलाग : अंधाराचा फायदा घेत चोरटे पसार

Dhule
वडजाई : गावात दोन दिवसापासून शेतातील इलेक्ट्रीक पोलवरील तार ४ रोजी चोरीस गेली होती. परंतु ५ रोजी रात्री दोन वाजता चोरटे पुन्हा तार चोरण्याचा प्रयत्न करीत असताना शेतातील रखवालदाराच्या लक्षात आले. त्याने दूरध्वनीद्वारे मालकाला कळविल्यानंतर लागलीच गावातून चारजण येत असल्याचे लक्षात येताच चोरट्यांनी अधारांचा फायदा घेत दुचाकीने पलायन केले.
रात्री दोन वाजता चोर आणि शेतकऱ्यांमधील पळण्याचा थरार पाहावयास मिळाला. सलग दोन दिवस इलेक्ट्रीक तार चोरीस गेल्याने शेतकºयांमधून संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी चोरांचा बंदोबस्त करून रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी शेतकºयांकडून करण्यात येत आहे.
वडजाई येथील डॉ.प्रशांत देवरे यांच्या शेतातील एक गाळा तार चोरट्यानी ५ रोजी चोरण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या शेताजवळील रामकृष्ण पाटील यांच्या शेतातील खांबावरील तार रात्री दोन वाजता चोरटे कट करीत असतांना सालदाराच्या लक्षात आले. त्यांनी लगेच मालक रामकृष्ण पाटील यांना दूरध्वनीद्वारे माहिती दिली. माहिती मिळताच कैलास बाविस्कर, सुनील देवरे यांनीे तीन ते चार शेतकºयांना उठवून ते शेताकडे निघाले. परंतु मोटारसायकलवरुन बरेच लोक येत असल्याचे पोलवर चढलेल्या चोरांच्या लक्षात आल्याने ते त्वरित खाली उतरून चोर आपल्या मोटारसायकलीने दोनजण पसार झाले तर एक जण कपाशी पिकांच्या साहारा घेत पसार झाला.
यावेळी रात्रीचे तीन वाजले होते. शेतकºयांनी महामार्गापर्यंत त्यांचा पाठलाग केला. परंतु चोर पएलन जाण्यात यशस्वी झाले. ४ रोजी तीन गाळे तार चोरीस गेली व ५ रोजी पुन्हा प्रयत्न झाला. मात्र या चोरीचा वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचारी दखल घेत नाही.
वरिष्ठ अधिकाºयांना दूरध्वनीद्वारे शेतकºयांनी संपर्क केला असता कुणीही वरिष्ठांनी घटना स्थळाला भेट दिली नाही किंवा स्पॉट पंचनामा सुध्दा केला नाही.
यानंतर कर्मचारी व लाईनमन आले असता वरिष्ठांना कळविले असल्याचे सांगून मोकळे झाले. दहा दिवसापासून शेताची वीज बंद आहे. वारंवार दूरध्वनी करूनही वीज पुरवठा सुरू करीत नसल्याने शेतकºयांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
तार चोरीची खबर मोहाडी पोलिसांना रात्री तीन वाजता दूरध्वनीद्वारे देण्यात आली होती. त्यांनी लगेच दोन वाहने पाठविली. परंतु पोलिसांनी रात्रीची गस्त घालावी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडुन करण्यात येत आहे.