आग्रा रोडवर विद्युत डीपीला ट्रकची धडक!
By Admin | Updated: February 9, 2017 00:36 IST2017-02-09T00:36:08+5:302017-02-09T00:36:08+5:30
मध्यरात्रीची घटना : नियंत्रण सुटलेल्या ट्रकला कारही धडकली, वीजपुरवठा खंडित, दुरुस्तीचे काम सुरू

आग्रा रोडवर विद्युत डीपीला ट्रकची धडक!
धुळे : शहरातील आग्रा रोडवरील कराचीवाला खुंट परिसरात असलेल्या विद्युत डीपीला मध्यरात्री ट्रकने धडक दिली़ त्याचवेळी आग्रा रोडवरून येणारी कारदेखील या ट्रकवर धडकल्याने दुहेरी अपघात झाला़ या अपघातात जीवितहानी झाली नसली तरी विद्युत डीपीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आह़े महावितरणतर्फे विद्युत पुरवठा बंद करून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आह़े
शहरातील आग्रा रोडवरून मंगळवारी मध्यरात्री सुरतकडून जळगावकडे जाणारा ट्रक (एमएच 05- सीपी 6227) भरधाव वेगाने जात होता़ त्याचवेळी आग्रा रोडवरील कराचीवाला खुंट परिसराजवळ चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने तो चौकातील एका कोप:याला असलेल्या विद्युत पोलसह डीपीवर आदळला़ याचदरम्यान, देवपूर भागातून मोहाडीकडे जात असलेली एक कार (एमएच 18-टी 401) आग्रा रोडवरून येऊन अपघातग्रस्त ट्रकवर आदळली़ या भीषण अपघातामुळे विद्युत खांबावरील डीपी तुटून खाली पडली़ तर विद्युत खांब पूर्णपणे वाकले, तसेच अनेक तारा व अन्य साहित्याचेही नुकसान झाल़े या अपघातानंतर परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला़ या अपघातात ट्रकसह कारचेही मोठे नुकसान झाले आह़े या अपघातामुळे झालेला आवाज व वीजपुरवठा खंडित झाल्याने हा प्रकार तत्काळ आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास आला. त्यानंतर आझादनगर पोलीस घटनास्थळी पोहचल़े अपघातग्रस्त ट्रक व कार पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात आली़ या घटनेमुळे अपघातस्थळी दिवसभर शहर वाहतूक पोलिसांनी बॅरिकेटींग करून वाहतुकीवर नियंत्रण ठेवले होत़े तर वर्दळीच्या आग्रा रोडवर झालेला हा अपघात पाहण्यासाठीही नागरिकांनी गर्दी केली होती़ रात्री अखेर वीजपुरवठा सुरळीत झाला़
अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल
अपघातप्रकरणी हेमराज भरत सूर्यवंशी वय 33, रा़ मोहाडी यांनी आझादनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आह़े त्यावरून अज्ञात आरोपींविरुद्ध भादंवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस उपनिरीक्षक ओगले करीत आहेत़