कापडणे गटातील विजेच्या समस्या मार्गी लावाव्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:24 IST2021-07-21T04:24:27+5:302021-07-21T04:24:27+5:30
कापडणे जिल्हा परिषद गटातील गावात वीज वितरण कंपनीच्या दिरंगाई, सुस्त कारभारामुळे ग्रामस्थांचे, शेतकऱ्यांचे कृषिपंप, विजेचे प्रश्न वारंवार उद्भवत आहेत. ...

कापडणे गटातील विजेच्या समस्या मार्गी लावाव्यात
कापडणे जिल्हा परिषद गटातील गावात वीज वितरण कंपनीच्या दिरंगाई, सुस्त कारभारामुळे ग्रामस्थांचे, शेतकऱ्यांचे कृषिपंप, विजेचे प्रश्न वारंवार उद्भवत आहेत. कापडणे-देवभाने रस्त्यावरील डीपी जळाली आहे, त्वरित नवीन पेटी बसवावी,
न्याहळोद रस्त्यावरील गोरख दंगल पाटील यांची शेताजवळील जळीत ट्रांसफार्मर त्वरित बसवावे. कापडणे सबस्टेशनवरून धनुर गावासाठी नवीन ११ केव्ही वाहिनी टाकणे, धनुर येतील शाळेच्या आवारातील लघुदाब वाहिनी स्थलांतर करावी, लोंबकळणाऱ्या तारा दुरुस्ती कराव्यात, जिल्हा नियोजन समिती मार्फत कापडणे जि.प. गटातील कापडणे, धनुर न्याहळोद, कौठळ, तामसवाडी-हेंकळवाडी गावातील मंजूर नवीन ट्रांसफार्मर त्वरित बसवावेत आदी मागण्या करण्यात आल्या.
यावेळी जि.प.चे माजी कृषी सभापती बापू खलाणे, भाजप तालुका अध्यक्ष देवेंद्र पाटील, माजी पं.स.सदस्य रवींद्र पाटील, दापुरा सरपंच किशोर पाटील, शेतकरी रवींद्र त्र्यंबक पाटील आदी उपस्थित होते.