धुळ्यात निवडणुकीपूर्वी रस्त्यांचे काम मार्गी लावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 22:47 IST2018-06-01T22:47:00+5:302018-06-01T22:47:00+5:30

अनिल गोटे : सभेत व्यक्त केला विश्वास, विरोधकांवर टिकास्त्र

Before the elections in Dhule, the road work will be done | धुळ्यात निवडणुकीपूर्वी रस्त्यांचे काम मार्गी लावणार

धुळ्यात निवडणुकीपूर्वी रस्त्यांचे काम मार्गी लावणार

ठळक मुद्देआमदार अनिल गोटे यांची सभाविरोधकांवर टिकास्त्रशहरात होणार विकासाची कामे

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरातील पांझरा नदी किनारी दोन्ही बाजूंना प्रत्येकी साडेपाच किलोमीटर अंतराच्या रस्त्यांचे काम मार्गी लावले जात आहे़ महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी या दोन्ही रस्त्यांचे काम मार्गी लागलेले असेल, असा विश्वास आमदार अनिल गोटे यांनी सभेतून व्यक्त केला़ 
शहरात साक्री रोडवरील सत्य साईबाबा कॉलनी परिसरात शुक्रवारी सायंकाळी उशिरा आमदार अनिल गोटे यांची ‘आमदार आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत सभा आयोजित करण्यात आली होती़ त्यावेळी ते बोलत होते़ 
आमदार गोटे म्हणाले, शहरातील पांझरा नदी किनारी दोन्ही बाजूंना तयार होणाºया रस्त्यांवर भाजी विक्रेते, मटन विक्रेते अशा सर्वांसाठी स्टॉलची रचना करण्यात येणार आहे़ शेतकरी आपला माल थेट येथे आणून विकू शकतील. मधली दलाली मोडीत काढण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे़ या रस्त्यातंर्गत वेगवेगळ्या सहा ठिकाणी चौपाटी असेल़ तसेच गणपती मंदिराजवळ झुलता पुल तयार करणार असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला़ 

Web Title: Before the elections in Dhule, the road work will be done