राज्य सरचिटणीसपदी शिवानंतद बैसाणे यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:24 IST2021-07-04T04:24:35+5:302021-07-04T04:24:35+5:30
महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या राज्य सरचिटणीसपदी शिवानंद बैसाणे, तर धुळे जिल्हाध्यक्षपदी राजेंद्र भामरे धुळे : महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय ...

राज्य सरचिटणीसपदी शिवानंतद बैसाणे यांची निवड
महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या राज्य सरचिटणीसपदी शिवानंद बैसाणे, तर धुळे जिल्हाध्यक्षपदी राजेंद्र भामरे
धुळे : महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या राज्य सरचिटणीसपदी शिवानंद बैसाणे, तर जिल्हाध्यक्षपदी राजेंद्र भामरे यांची निवड करण्यात आली. राज्य सरचिटणीस पदावर कार्यरत नाशिकचे राजेंद्र म्हसदे यांचे एप्रिल महिन्यात अल्पशा आजाराने निधन झाल्याने हे पद गेल्या तीन महिन्यांपासून रिक्त होते.
संघटनेचे राज्याध्यक्ष शामराव जवंजाळ यांच्या आदेशान्वये राज्य कार्यकारिणीची ऑनलाईन बैठक झाली. त्यात राज्य सरचिटणीस पदाच्या नेमणुकीबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी संघटनेचे राज्य कोषाध्यक्ष राजेंद्र भामरे यांनी शिवानंद बैसाणे यांचे नाव सुचविले. त्यांनी सांगितले की, पंधरा वर्षांपासून मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे धुळे जिल्हाध्यक्ष पदाची व दहा वर्षांपासून धुळे व नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन व सध्या संचालक म्हणून कार्यरत आहेत. तसेच तीन वर्षांपासून धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष म्हणून धुरा यशस्वीपणे सांभाळत असलेले शिवानंद दला बैसाणे यांना राज्य सरचिटणीस म्हणून संधी देण्यात यावी असे सुचविले.
त्यांच्या सूचनेला नाशिकचे कैलास बोढारे यांनी अनुमोदन दिले. राज्य कार्यकारिणीने सहमती दर्शवली व सर्वांनुमते महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या सरचिटणीसपदी शिवानंद बैसाणे यांची नेमणूक करण्यात येत असल्याचे राज्यध्यक्ष शामराव जवंजाळ यांनी घोषित केले. तसेच धुळे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी राजेंद्र भामरे यांच्यावर सोपविण्यात आली.
या निवडीबद्दल सोलापूर राज्य कार्याध्यक्ष चंदन लांडगे, उस्मानाबाद राज्य कोषाध्यक्ष अनिल बागुल, धुळे जिल्हा सरचिटणीस सुरेंद्र पिंपळे, दीपक शिंदे, ज्ञानेश्वर पवार, रवींद्र मोरे, चुडामण बोरसे, भूपेश वाघ, चंद्रकांत सत्तेसा, ग. स. बॅंकचे व शिक्षक पतपेढी धुळेचे गटप्रमुख रवींर खैरनार, ग. स. बँकेचे गटप्रमुख निशांत रंधे, ग. स. बँक व पतपेढीचे संचालक गमण पाटील, शरद पाटील, दिनेश चव्हाण, बबन नगराळे, शिक्षक पतपेढीचे चेअरमन दिनेश पाडवी, व्हा. चेअरमन अनिल नहिरे, संदिप मराठे, संजय शिंदे, प्रवीण भदाणे, आनंद पाटील, भीमराव माळी, रवींद्र बोरसे, पुखराज पाटील, आरक्षण हक्क समितीचे दीपक शिंदे, वाल्मिक येलेकर, कुणाल वाघ, योगेश धात्रक, रोहिदास गायकवाड आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.