ॲपे रिक्षा गतिरोधकावर आदळल्याने वृद्ध महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:38 IST2021-05-06T04:38:05+5:302021-05-06T04:38:05+5:30

लासाबाई संपत शिंदे (वय ७०, रा. पाचमाैली, ता. साक्री) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. साक्री तालुक्यातील मोगरपाडा ते ...

An elderly woman died when her rickshaw collided with a speed bump | ॲपे रिक्षा गतिरोधकावर आदळल्याने वृद्ध महिलेचा मृत्यू

ॲपे रिक्षा गतिरोधकावर आदळल्याने वृद्ध महिलेचा मृत्यू

लासाबाई संपत शिंदे (वय ७०, रा. पाचमाैली, ता. साक्री) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. साक्री तालुक्यातील मोगरपाडा ते पाचमाैली रस्त्यावर १८ एप्रिल रोजी दुपारी चारच्या सुमाराला हा अपघात झाला. वृद्धेवर दहिवेल ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर तिला धुळे येथे हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना २२ एप्रिल रोजी सदर महिलेचा मृत्यू झाला. एमएच ४१ व्ही ५८५६ क्रमांकाच्या ॲपे रिक्षामध्ये बसून सदर महिला मोगरपाडा येथून पाचमाैलीला येत होती. पाचमाैली गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावर पंग्या गुलाब जगताप यांच्या शेताजवळ ॲपे रिक्षा गतिरोधकावरून जोरात आदळली. त्यामुळे लासाबाई बाहेर फेकली गेली. त्यात तिच्या डोक्याला मार लागला होता.

रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत भरधाव वेगाने वाहन चालवून महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने ॲपे रिक्षाचालक पाेसल्या तापीराम गांगुर्डे (३०, रा. कुत्तरमोर, ता. साक्री) याच्याविरुद्ध मंगळवारी (दि. ४) दुपारी साक्री पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०४ अ, २७९, ३३७, ३३८ सह मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४/१७७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक पी. एम. बनसोडे करीत आहेत.

Web Title: An elderly woman died when her rickshaw collided with a speed bump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.