शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर निवडणूक रद्दही होऊ शकते; निवडणुकांवरील टांगती तलवार कायम
2
नरिमन पाँईंटवरून थेट विरार...पोहचा एका तासातच सुसाट; उत्तन-विरार सागरी सेतूच्या ‘DPR’ला मान्यता
3
रेड झोन झाला तर बांधकामे बंद होणार; प्रदूषणाचा विळखा कायम, मुंबई महापालिकेचा इशारा
4
असत्यावर सत्य विजय मिळविते याचे भगवा ध्वज हे प्रतीक - पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
मुंबईत ४.३३ लाख दुबार मतदार, महापालिकेची कबुली; म्हणाले, नावे काढण्याचा अधिकार आम्हाला नाही
6
खोटा प्रचार केल्याने वास्तव बदलणार नाही; अरुणाचल प्रदेशावर दावा करणाऱ्या चीनला भारताचे प्रत्युत्तर
7
पतीकडून शारीरिक, मानसिक छळ; सेलिना जेटली हायकोर्टात, ५० कोटींची पोटगी हवी?
8
४ वर्षांची चिमुकली सहा महिन्यांनी पुन्हा आईच्या कुशीत; लेकीला पाहिले अन् आईची शुद्ध हरपली 
9
शेवग्याची शेंग ५०० रुपये किलाेवर; संपूर्ण राज्यात महिनाभर तुटवडा राहणार, कारण काय?
10
वरळीतील ४ प्रभागांत सर्वाधिक दुबार मतदार; उद्धवसेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागात आढळली दुबार नावे
11
TET Paper Leak: मराठवाड्यातून गोंदियातील शिक्षकांना कॉल, कुणाकडे दीड लाख, कुणाला मागितले तीन लाख रुपये
12
'सहकुटुंब सहपरिवार' फेम अभिनेत्री अडकली लग्नबेडीत, पुण्यात थाटामाटात पार पडला विवाहसोहळा
13
चीनने पुन्हा गरळ ओकली; अरुणाचल प्रदेश चीनचा भाग असल्याचा पुनरुच्चार...
14
Travel : परदेशात कशाला... भारतातच आहे 'मिनी थायलंड'; कपल्ससाठी 'स्वर्गीय' ठिकाण!
15
तुम्हीही बेडवर लॅपटॉप चालवताय? एक मोठी चूक आणि बसू शकतो हजारोंचा फटका! ताबडतोब वाचा...
16
'...तर देशभरात भाजपचा पाया हादरवून टाकेन', SIR प्रक्रियेवरुन ममता बॅनर्जींचा केंद्रावर हल्लाबोल
17
भेटायला म्हणून गेला अन् भलताच अडकला! गावकऱ्यांनी २ मुलांच्या आईसोबत लावून दिलं तरुणाचं लग्न अन्... 
18
राम मंदिरावर धर्मध्वज डौलानं फडकला, ध्वजावरील ‘ते’ झाड नेमकं कोणतं? इंटरेस्टिंग माहिती...
19
थोडी सभ्यता बाळगा! विमानतळावर पायजमा-स्लिपर घालून येऊ नका! अमेरिकेत निघाला ट्रम्प सरकारचा फतवा
20
"जे होतं ते आम्ही फडणवीस यांच्यासमोर मनमोकळ्या...", महायुतीतील नाराजी नाट्यावर एकनाथ शिंदेंचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

बसच्या धडकेत वृध्द जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 22:57 IST

साक्री रोड परिसर : दुपारचा चहा घेऊन घरी परतत असताना घडली दुर्घटना

धुळे : साक्रीकडून शहरात भरधाव वेगाने येणाºया गुजरात राज्याच्या बसने वृध्दाला जोरदार धडक दिली़ अपघाताची ही घटना साक्री रोडवरील मच्छिबाजार भागात दुपारी घडली़ या अपघातात वृध्दाला डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू ओढवला़ ते दुपारचा चहा पिण्यासाठी आल्याने घराकडे जात असताना ही दुर्घटना घडली़ या अपघातामुळे वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा वाजले असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे़ साक्री रोड भागातील शनिनगरात राहणारे गिरजाआप्पा वेडू वाडेकर (७०) यांचा अपघातात मृत्यू झाला आहे़ गिरजाआप्पा यांनी आपल्या कार्यकाळात हमाली आणि दुध-दहीचा व्यवसाय करुन आपल्या परिवाराचा चरितार्थ भागविला़ अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून त्यांनी आपल्या चार मुलांना घडविले़ यात लहानपणीच एका मुलाचा मृत्यू झाल्याने ते खचले होते़ पण, त्यातूनही त्यांनी स्वत:ला सावरत खंबीरपणे उभे राहिले़ हमालीचे काम त्यांनी सोडले नाही़ हमालीसोबतच त्यांनी दूध दही सुध्दा विकण्याचे सोडले नाही़ त्यांची पत्नी त्यांच्या पाठीशी असल्याने त्यांच्या तीन मुलांना त्यांनी शिकविले आणि वाढविले़ यातील एक मुलगा किरणा दुकानात काम करतो तर उर्वरीत दोन मुले ही दूध डेअरीवर काम करतात़ चहा ठरला शेवटचादररोज दुपारच्यावेळेस गिरजाआप्पा वाडेकर साक्री रोडवरील हॉटेलवर चहा पिण्यासाठी यायचे़ या भागात त्यांचा मित्र परिवार आहे़ गप्पाटप्पा केल्यावर चहाचा आस्वाद घेतल्यावर ते घराकडे परतत यायचे़ ते सहसा साक्री रोडवरच फिरायचे़ गुरुवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घराकडे परतत होते़ त्याचवेळेस गुजरात राज्याची जीजे १८ झेड ५०६५ क्रमांकाची बस साक्रीकडून धुळ्याकडे येत होती़ मच्छिबाजार परिसरात बसची धडक वृध्दाला बसली आणि गिरजाआप्पा यांना जबर दुखापत झाली़ घटनास्थळी पोलीस दाखलसाक्री रोड भागात एसटी बसने वृध्दाला जोरदार धडक दिल्याने घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर गर्दी जमा झाली होती़ अपघाताची माहिती मिळताच धुळे शहर पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाºयांनी धाव घेतली़ ही बस शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आली असून अपघाताची नोंद करण्यात आली़ २९ रोजी सकाळी ११ वाजता अंत्ययात्रा निघणार आहे़ अपघाताची मालिकाचसाक्री रोडवर होणारे सातत्याने अपघात रोखण्यासाठी रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले़ रस्त्यात दुभाजक देखील टाकण्यात आले़ तरी देखील रस्ता रुंद होण्याऐवजी अरुंद असल्याचे स्पष्ट आहे़ या रस्त्यावर लहान-मोठ्या वाहनांची वर्दळ सतत सुरु असते़ याच रस्त्यावर शाळकरी मुलीने देखील आपले प्राण गमाविले आहे़ या अनुषंगाने वाहतूक व्यवस्था सुधारेल, अशी अपेक्षा असताना मात्र परिस्थितीत काहीही फरक पडला नसल्याचे समोर येत आहे़ 

टॅग्स :DhuleधुळेAccidentअपघात