आणखी आठ पॉझीटीव्ह रूग्ण आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 22:38 IST2020-06-20T22:34:34+5:302020-06-20T22:38:21+5:30
बाधीत रूग्णांची संख्या ४९५ वर पोहोचली

Dhule
धुळे- जिल्ह्यातील आणखी आठ रूग्णांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. धुळे शहरात आणखी चार नवे रूग्ण आढळले आहेत. तर शिरपूर येथील तीन व धुळे तालुक्यातील नेर येथील एका रूग्णाचे रिपोर्ट पॉझीटीव्ह आले आहेत. जिल्ह्यातील एकूण बाधीत रूग्णांची संख्या ४९५ वर पोहोचली आहे. कोरोनामुळे ४६ रूग्णांचा मृत्यू झाला आहे तर ३१५ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.