शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

नैसर्गिक आपत्तीमुळे महावितरणला आठ महिन्यात दीड कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 22:10 IST

धुळे जिल्हा : वीज वाहिनींवरील १ हजार ८२ पोल व ४३ रोहित्र पडले, सबस्टेशनवरील ट्रान्सफार्मरही पडले

अतुल जोशी। धुळे  : पूर, वादळ या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेकांना नुकसान सोसावे लागत असते. त्याचप्रमाणे जिल्ह्यात महावितरण कंपनीलाही नैसर्गिक आपत्तीचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. गेल्या आठ महिन्यात उच्चदाब, लघुदाब वाहिनीवरील पोल पडणे, रोहीत्र जळणे यामुळे महावितरण कंपनीला सुमारे १ कोटी ४१ लाख रूपयांचा फटका बसल्याची माहिती महावितरण कंपनी कार्यालयातून देण्यात आली.आता गावातील प्रत्येक घरापर्यंत, शेती, पाड्यांपर्यंत वीज पोहचलेली आहे. त्यामुळे महावितरणचे जाळे मोठ्या प्रमाणात विस्तारलेले आहे. वीज पुरवठ्यासाठी जागोजागी विद्युत खांब उभे केले जातात. रोहीत्र बसविले जातात. उच्चदा, लघुदाब वाहिनीद्वारे सर्वत्र वीज पुरवठा केला जात असतो. पूर, वादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेकदा पोल पडतात, तारा तुटतात. काहीवेळेस रोहीत्र जळण्याच्या घटनाही घडत असतात. त्यामुळे महावितरण कपंनीलाही त्याचा आर्थिक फटका बसत असतो. धुळे जिल्ह्यात जानेवारी ते आॅगस्ट २०१९ या आठ महिन्याच्या कालावधीत झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे महावितरण कंपनीला १ कोटी ४१ लाखांचा फटका सोसावा लागला आहे. सर्वाधिक नुकसान हे इलेक्ट्रीक पोलचे झालेले आहेत. यात उच्चदाब वाहिनीवरील ३७९ तर लघुदाब वाहिनीवरील ७०३ पोल पडले. तर वादळामुळे रोहीत्र पडल्याच्याही घटना घडलेल्या आहेत. गेल्या आठ महिन्यांमध्ये  वादळामुळे जवळपास ४३ रोहीत्र पडले. त्याची किंमत १२ लाख ९८ हजार रूपये आहे. तर सबस्टेशनवरील पॉवर ट्रान्सफार्मर पडल्याने सुमारे १५ लाखांचा फटका बसला. त्याचप्रमाणे या आठ महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यात ३६ रोहीत्र जळाल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे महावितरणला ३६ लाख ५६ हजाराचे नुकसान सोसावे लागल्याची माहिती महावितरणमधून देण्यात आली.*नवीन मीटर बदलविण्यास सुरूवात*वीज चोरीला आळा बसावा, त्याचबरोबर अचूक रिडींग यावे यासाठी महावितरण कंपनीतर्फे  सर्वच वीज मीटर बसविण्यास सुरूवात झालेली आहे. जिल्ह्यात वीज ग्राहकांची संख्या १ लाख १४ हजार ८२७ एवढी असून, आतार्पयंत धुळे शहरातील १३०० मीटर बदलविण्यात आले आहेत. या नवीन मीटरचा ठेका जेनस कंपनीला देण्यात आलेला आहे. महावितरणतर्फे सर्वच मीटर बदलविण्यात येणार असले तरी त्यासाठी ग्राहकाला कुठलाही भुर्दंड बसणार नसल्याने, महावितरणने एकप्रकारे दिलासा दिलेला आहे. सध्या कार्यरत असलेल्या इलेक्ट्रॉनिक्स मीटरची जागा  डिजीटल मीटर घेणार आहेत.

टॅग्स :Dhuleधुळे