पोलीस कर्मचाऱ्यासह आठ जुगारी जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 22:04 IST2020-06-07T22:03:43+5:302020-06-07T22:04:03+5:30
एलसीबीची कारवाई : गंभीर गुन्हे दाखल

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : येथील स्थनिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जुगाराच्या अड्डयावर छापा मारुन एका पोलीस कर्मचाºयासह आठ जुगारींना पकडले आहे़
धुळे शहरातील मुल्लावाडा, गल्ली क्रमांक दोन, एका रक्तपेढीसमोर इमारतीच्या दुसºया मजल्यावर जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती़ त्यानुसार स्थनिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने शनिवारी दुपारी अचानक छापा मारला़ त्यावेळी अनिल भानुदास माडगुळकर हा सोशल क्लबच्या नावाखाली स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी पत्त्यांचा जुगार खेळविताना तसेच बेकायदेशिर दारुच्या बाटल्या क्रिडा मंडळातील कार्यालयात बाळगाना आढळून आला़
सध्या कोरोना या संसर्गजन्य आजाराची साथ सुरू असताना कोणतीही आरोग्य तपासणी न करता व शासनाच्या आदेशाचे पालन न करता जुगार खेळला जात असल्याचे समोर आले आहे़
याप्रकरणी एलबीचे कॉन्स्टेबल राहुल प्रमोद सानप यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अनिल भानुदास माडगुळकर रा़ जयशंकर कॉलनी, भानुदास सखाराम माडगुळकर, सचिन सुमनलाल जैन रा़ गल्ली क्रमांक दोन, फिरोज शहा याकुब शहा रा, अंबिका नगर, हबीब बेग रशीद बेग मिर्झा रा़ अविष्कार कॉलनी, जतीन जयवंतलाल शाह रा़ सुदर्शन कॉलनी, शंकर सिध्दीराम लकडे रा़ माधवपूरा आणि पोलीस कर्मचारी साबिर शेख शफिक रा़ वडजाई रोड आझादनगर अशा आठ जणांविरुध्द शहर पोलीस ठाण्यात मुंबई जुगार अधिनियम, मुंबई दारुबंदी कायदा तसेच साथीचे रोग प्रतिबंधक कायदा, महाराष्ट्र कोवीड १९ उपाययोजनेचे नियम व भादंवी कलम १८८, आपत्ती व्यवस्थापन अधिनियमान्वये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, एलसीबी पीआय शिवाजी बुधवंत, पीआय हेमंत पाटील आदींनी घटनास्थळी भेट दिली़
या गुन्ह्यातील संशयित साबिर शेख शफिक (४६) हा आझादनगर पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी असून पोलीस मुख्यालयात नेमणुकीस आहे़