शेतीसाठी दिवसा वीजपुरवठ्यासाठी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:36 IST2021-01-23T04:36:25+5:302021-01-23T04:36:25+5:30

सोनगीर परिसरातील देवभाने, सायने, नंदाणे, सरवड, मल्हापाडा या गावांना अखंडित २४ तास वीजपुरवठा व्हावा, म्हणून आ.कुणाल पाटील यांच्या प्रयत्नाने ...

Efforts for daytime power supply for agriculture | शेतीसाठी दिवसा वीजपुरवठ्यासाठी प्रयत्न

शेतीसाठी दिवसा वीजपुरवठ्यासाठी प्रयत्न

सोनगीर परिसरातील देवभाने, सायने, नंदाणे, सरवड, मल्हापाडा या गावांना अखंडित २४ तास वीजपुरवठा व्हावा, म्हणून आ.कुणाल पाटील यांच्या प्रयत्नाने देवभाने गावठाण विद्युत वाहिनी प्रकल्प मंजुर करण्यात आला होता. या विद्युत वाहिनीचे काम नुकतेच पूर्ण झाले. या कामासाठी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यात २१.६४ किमीची ११ के.व्ही. उच्च दाब वाहिनी, २.९५ किमीची लघुदाब वाहिनी आणि ८ रोहित्र यांचा समावेश आहे. ही विद्युत वाहिनी सोनगीर विद्युत केंद्राजवळ उभारण्यात आला आहे.

या ११ केव्हीच्या गावठाण विद्युत वाहिनीमुळेे चार गावांचा विजेचा प्रश्‍न सुटला असून, त्यांना अखंडित वीजपुरवठा होणार आहे. धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा कसा मिळेल, यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. सोनगीर ग्रामपंचायत सदस्य केदारेश्‍वर मोरे यांनी सोमेश्‍वर वसाहत, कॉलनी परिसर आणि अहिल्यानगर येथे नियमीत वीजपुरवठा व्हावा, म्हणून ट्रान्सफार्मर आणि स्ट्रीट लाइट व पोल उभारण्यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे आ.पाटील यांनी सांगितले. यावेळी जिल्हा काँग्रेसचे सचिव डॉ.दरबारसिंग गिरासे, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता गणेश अस्मार, पंचायत समितीचे माजी सदस्य अविनाश महाजन, जि.प.सदस्य ज्ञानेश्‍वर चौधरी, पं.स.सदस्य चेतन चौधरी, माजी पं.स.सदस्य योगेश पाटील, नवनिर्वाचित ग्रा.पं.सदस्य केदारश्‍वर मोरे, आरिफ पठाण, मुन्ना पठाण, लखन रूपनर, प्रमोद धनगर, बुरझड उपसरपंच एन.डी.पाटील, नंदाणे माजी सरपंच माधवराव पाटील, अल्ताफ हाजी, हसण पठाण, देवभाने माजी सरपंच संजय देसले, शफी पठाण, कैलास लोहार, नंदाणे सरपंच व्यंकटभाई पाटील, सहा.अभि. हेमेंद्र जगनिया, हेमंत अहिरे, एस.एम.माळी, डी.ई.चौधरी, एन.एम. पाटील, पी.डी. धनगर, एस.ए.पाटील आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रमोद धनगर यांनी केले.

Web Title: Efforts for daytime power supply for agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.