शिक्षण समाज विकासाचे प्रमुख साधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:07 IST2021-02-18T05:07:08+5:302021-02-18T05:07:08+5:30
शहरातील जयहिंद शैक्षणिक संस्था संचालित झेड.बी. पाटील महाविद्यालयात शिक्षणमहर्षी ॲड.नानासाहेब झेड.बी.पाटील व्याख्यानमालेत मायक्रोसॉफ्ट टीम्स या व्यासपीठावर आयोजित "शिक्षण ...

शिक्षण समाज विकासाचे प्रमुख साधन
शहरातील जयहिंद शैक्षणिक संस्था संचालित झेड.बी. पाटील महाविद्यालयात शिक्षणमहर्षी ॲड.नानासाहेब झेड.बी.पाटील व्याख्यानमालेत मायक्रोसॉफ्ट टीम्स या व्यासपीठावर आयोजित "शिक्षण आणि समाजजीवन" या विषयावर ऑनलाइन व्याख्यान प्रसंगी डॉ.विश्वास पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे ज्येष्ठ संचालक अजित मोरे होते. तर संस्थेचे अध्यक्ष डॉ.अरुण साळुंके, उपाध्यक्ष प्रमोद पाटील, सचिव प्रदीप भदाणे, महाविद्यालय विकास समिती चेअरमन प्रा.सुधीर पाटील व संचालिका डॉ.नीलिमा पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
डॉ. विश्वास पाटील पुढे म्हणाले की, आज आपण आत्मकेंद्रित होत चाललो आहोत. समाज विकास व सुदृढ समाज निर्मितीसाठी माणसाने स्वार्थलोलूपता सोडून निसर्गाशी असलेला सुसंवाद दृढ केला पाहिजे. वर्तमानात माणसाला भेटण्याची, समूहात सामील होण्याची आवश्यकता आहे. आज समाजात आत्मविश्वास वाढण्यासाठी स्वतःकडून समूहाकडे जाण्याचा मार्ग जो गांधीजींनी, साने गुरुजींनी त्यांच्या विचारकार्यातून सूचित केलाय त्या मार्गाची कास धरावी लागेल. सामाजिक जीवनाचा आणि शिक्षणाचा आंतरसंबंध समजून घेता आला पाहिजे. सगळं विकत घेतले जाते, सगळं विकलं जाते, या अहंकारी भावनेला व आदिसत्तेला उभा छेद देणारी आदर्श मूल्य जगात आहेत.
अजितराव मोरे म्हणाले की, शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन असून, महात्मा फुले यांचे विचारसूत्र शिक्षणमहर्षी ॲड. नानासाहेब झेड.बी.पाटील यांचे जीवनसूत्र होते. म्हणजे खऱ्याअर्थाने ते कर्मयोगी होते.
प्रास्ताविक प्राचार्य डॉ.पी. एच. पवार यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.भाग्यश्री पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी व्याख्यानमाला संयोजिका प्रा.डॉ. योगिता पाटील, समिती सदस्य प्रा.डॉ.प्रवीणसिंग गिरासे, प्रा.विजय जवराळ, प्रा.गिरीष देसले, प्रा.निखिल पाटील, प्रा.नितीन वाळके, प्रा.कल्पना देवरे, प्रा.समीर शहा, प्रा.हर्षल गवळे प्रा.नीलिमा भदाणे, विलास सूर्यवंशी व आधार चव्हाण यांनी परिश्रम घेतले.