प्रयोगशाळांमधून मिळणारे शिक्षण बहुमूल्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 13:46 IST2020-02-08T13:45:40+5:302020-02-08T13:46:12+5:30

शिरपूर : कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी होमीभाभा सेंटरचे वैज्ञानिक प्रा.नागार्जुन

Education from laboratories is valuable | प्रयोगशाळांमधून मिळणारे शिक्षण बहुमूल्य

dhule


लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : पुस्तकी शिक्षणापेक्षा अशाप्रकारच्या प्रयोगशाळांमधून मिळालेले शिक्षण हे भारताला सक्षम बनविण्यासाठी उपयोगी ठरेल़ ज्या शाळांना अटल लॅब नाहीत त्या शाळांमध्ये सुध्दा अगदी कमी खर्चात अशा प्रकारच्या लॅब उपलब्ध करू शकतात, असे प्रतिपादन होमीभाभा सेंटरचे वैज्ञानिक प्रा.नागार्जुन यांनी केले़
७ रोजी शहरातील आऱसी़पटेल माध्यमिक विद्यालयाच्या अटल टिंकरींग लॅबमध्ये सुरू असलेल्या चार दिवशीय कार्यशाळेचा समारोप झाला़ याप्रसंगी सहभागी विद्यार्थ्यांनी तयार केलेले प्रकल्प सादर केले़
यावेळी होमीभाभा सेंटरचे वैज्ञानिक विनोद सोनवणे, जुड डिसोजा, रवी सिन्हा, आशिषकुमार परदेशी, सुरेंद्र पाटील, सोहम दिघे, विणू गोपाल, संस्थेचे सीईओ डॉ़उमेश शर्मा, एच़आऱपटेल फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ़संजय बारी, डॉ़व्हीक़े़ चटप, प्राचार्य दिनेश राणा, प्राचार्य निश्चल नायर, प्राचार्य पी़व्ही़ पाटील, प्राचार्य आऱबी़ पाटील, मुख्याध्यापक ठाकरे, कार्यशाळेचे समन्वय एऩई़चौधरी आदी उपस्थित होते़
अटल टिंकरींग लॅबमध्ये ‘प्रोजेक्ट बेस लर्निंग फॉर स्टेम गेम्स’ या विषयावर धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील ११ अटल लॅबमधील निवडक १२३ विद्यार्थ्यांसह १७ शिक्षक सहभागी झाले होते़ विद्यार्थ्यांसह शिक्षकांना संशोधन कसे करावे याचे मार्गदर्शन करण्यासाठी होमीभाभा सेंटरचे वैज्ञानिक दाखल झाले होते़ कार्यशाळा यशस्वीतेसाठी समन्वय एऩई़ चौधरी, व्ही़डी़ पाटील, जीक़े़ सोनवणे, बी़एस़ महाजन, एऩए़ बाविस्कर यांनी परिश्रम घेतले़

Web Title: Education from laboratories is valuable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे