Early morning stone pelting on the houses of the NCP city district president in Dhule | धुळ्यातील राष्ट्रवादीच्या शहर जिल्हाध्यक्षांच्या घरांवर पहाटे दगडफेक

धुळ्यातील राष्ट्रवादीच्या शहर जिल्हाध्यक्षांच्या घरांवर पहाटे दगडफेक

धुळे : राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले यांच्या घरावर मंगळवारी पहाटे दीड वाजेच्या सुमारास कोणीतरी दगडफेक केली़ यात घरांच्या खिडकीच्या आणि अंगणात उभ्या असलेल्या कारचे काचा फूटल्या़
देवपुरातील गोंदूर रोडवरील शिवसागर मंगल कार्यालयाच्या मागील बाजूस धनदाई नगर आहे़ याठिकाणी रणजित राजे भोसले यांचे निवासस्थान आहे़ पहाटे दीड वाजेच्या सुमारास कोणीतरी अज्ञातांनी त्यांच्या घरावर जिवघेणा हल्ला करीत दगडफेक केली़ त्यात खिडक्यांच्या काचा, दारापुढे लावलेली एमएच १८ बीएच २१५७ क्रमांकाच्या कारचे काचा फुटल्या, सुदैवाने भोसले परिवार सुखरुप असून कोणालाही काहीही दुखापत झाली नाही़ आवाज ऐकून भोसले घराबाहेर आले़ तोपर्यंत दगडफेक करणाऱ्यांनी पळ काढला होता़
या प्रकारानंतर सकाळी पश्चिम देवपूर पोलिसांना घटनेची माहिती कळविण्यात आली़ पश्चिम देवपूर पोलीस निरीक्षक सतिष गोराडे व पथक त्यांच्या घरी दाखल झाले होते़ याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात रणजित राजे भोसले यांनी फिर्याद दाखल केल्याने गुन्हा दाखल झाला आहे़

Web Title: Early morning stone pelting on the houses of the NCP city district president in Dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.