The Dwarkadhishi Yatra begins with excitement | द्वारकाधीश यात्रोत्सवास उत्साहात प्रारंभ

dhule

dमालपूर : शिंदखेडा तालुक्यातील देवांचे विखरण येथे दिडशे वर्षाची परंपरा असलेल्या यात्रा उत्सवाला शुक्रवारपासून उत्साहात प्रारंभ झाला. यावर्षी पावसाचे संकट उभे राहिले तरी सकाळपासूनच यात्रेत गर्दी दिसून आली. तर द्वारकाधीस मंदिरात दर्शनासाठी पहाटेपासूनच रांगा लागल्या होत्या. विक्रेते व हॉटेल व्यावसायिकांची चांगलीच विक्री झाल्याने त्यांच्यातही समाधानाचे वातावरण होते.
दोंडाईचा-धुळे रस्त्यालगत विखरण येथे द्वारकाधीश मंदिर असून तेथे भगवान विष्णूंची स्वयंभू मूर्ती खोदकामात सापडेली असल्याचे गावकरी सांगतात. त्या मूर्तीची तत्कालीन परिस्थितीत विधीवत स्थापना करुन तेव्हा पासून परंपरागत कार्तिकी एकादशीच्या दिवशी यात्रा भरते. धुळे जिल्हासह खान्देशात ही यात्रा प्रसिद्ध आहे. या यात्रेपासुन ख?्या अथार्ने खान्देशात यात्राना सुरुवात होत असल्याचे गावकरी सांगतात. या यात्रेत सकाळी रात्री मोठी गर्दी यात्रेकरुंनी केली.
या यात्रेत दुरदुरवरुन आलेले भाविक नवस फेडतांना दिसून आले. तर परिसरातील नागरिक संसार उपयोगी साहित्य खरेदी करतांना गर्दी केली होती. मात्र यावर्षी परतीच्या व चक्रीवादळाचे पावसाचे सावट तसेच ९ नोव्हेंबर रोजी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असल्याने विक्रेते व व्यावसायिकांमध्ये याची धास्ती आहे. यामुळे तारांबळ उडतांना दिसून आली.
खेळणी विकणारे विक्रेते, दरवर्षी यात्रेत येणारे हॉटेल व्यवसायिक दाखल झालेले आहेत. महिलांसाठी प्रसाधन सौंदर्याची दुकाने लागली आहेत. सुमारे आठदिवस या यात्रेची येथे वर्दळ सुरू असते. यात दोन दिवस लांब दुरवरुन मनोरंजनासाठी तमाशा फड दाखल झाले आहेत. तसेच करमणुकीसाठी पालख्या विविध खेळांच्या कसरतीचे प्रकार देखील या यात्रेत पाहावयास मिळत असल्याने परिसरातील भाविक मोठ्या संख्येने या यात्रेत मोठ्या उत्साहाने सहभागी होत होते.
यावेळी ग्रामस्थांच्या उपस्थित ध्वज पुजन देखील झाले. यानंतर भजन गायनाने उत्सवास प्रारंभ झाला. जिल्ह्यात प्रतिपंढरपुर समजले जाणारे द्वारकाधीश संस्थान हे परिसरातील एक मुख्य वारकरी सांप्रदायिक पीठ असृन श्री सद्गुगुरु श्री विठ्ठल स्वामी महाराज यांनी त्याची स्थापना केल्याचे सांगण्यात येते. कार्तिकी एकादशी निमित्ताने नामसंकिर्तन सप्ताह श्रीमद भागवत पारायण किर्तन प्रवचने पालखी सोहळा आदींचे आयोजन करण्यात आले होते.

Web Title: The Dwarkadhishi Yatra begins with excitement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.