डमी क्र. ८४० कोरोना काळातील मोफत धान्याचा काहींना लाभ, तर काहींना करावी लागतेय प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:24 IST2021-06-24T04:24:46+5:302021-06-24T04:24:46+5:30
कोरोना संसर्ग वाढल्यामुळे राज्य शासनाकडून संचारबंदीसह निर्बंध लागू करण्यात आले होते; त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच व्यवसाय ठप्प झाले ...

डमी क्र. ८४० कोरोना काळातील मोफत धान्याचा काहींना लाभ, तर काहींना करावी लागतेय प्रतीक्षा
कोरोना संसर्ग वाढल्यामुळे राज्य शासनाकडून संचारबंदीसह निर्बंध लागू करण्यात आले होते; त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच व्यवसाय ठप्प झाले होते. त्यामुळे व्यापाऱ्यांसह मोलमजुरी करणाऱ्या व्यक्तीही अडचणीत आले होते. या काळात सर्वसामान्य व्यक्तींना उपासमारीला सामाेरे जावे लागू नये, म्हणून राज्य शासनाकडून मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला होता; परंतु अद्याप धान्यवाटपासंदर्भात काही गावे वंचित असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाकाळात शासनाने मोफत धान्य देण्याच्या निर्णयामुळे १३ हजार ८०० पेक्षा अधिक रेशनकार्डधारकांना लाभ मिळाला आहे. काही लाभार्थी आजही धान्यापासून वंचित असल्याचे दिसून येत आहे.
कोट
जिल्हा पुरवठा अधिकारी
मोफत धान्याचे वाटप वेळच्या वेळी सुरू आहे. मात्र, काही ठिकाणी होत नसेल तर, गावकऱ्यांनी तक्रार करावी. त्या संदर्भात चौकशी करून संबंधित दुकान कायमचे रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल.
- पुरवठा अधिकारी
धान्य घेतल्यानंतर अंगठा लावाच
अंगठा लावल्याने कोरोना पसरेल अशी भीती व्यक्त करीत ई-पॉस मशीनवर फक्त रेशन दुकानदाराचा अंगठा लावण्याची परवानगी राज्य शासनाने दिली आहे. याचाच गैरफायदा घेत काही ठिकाणी हे धान्य काळ्याबाजारात विक्री केले जात असल्याची माहिती आहे. नागरिकांनी सतर्क राहून दर महिन्याला मोफत धान्य घ्यावे. तसेच धान्य देत नसेल तर त्याची तक्रार जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयात करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
अंत्योदय ७६,९७६
प्राधान्य २२,१६६७
प्राधान्य कुटुंब २९७२२७