धुळयात एलबीटी वसुलीमुळे व्यापा-यांना मनस्ताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 17:32 IST2018-03-26T17:32:14+5:302018-03-26T17:32:14+5:30
ठेका रद्द करण्याची समाजवादी पार्टीची मागणी

धुळयात एलबीटी वसुलीमुळे व्यापा-यांना मनस्ताप
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : एलबीटीच्या माध्यमातून होणारे कर संकलन ठेकेदाराकडून बेकायदेशिरपणे करण्यात येत आहे़ त्यामुळे व्यापाºयांना होत असलेला मनस्ताप थांबविण्यासाठी एलबीटीचा ठेका रद्द करावा, अशी मागणी समाजवादी पार्टीतर्फे महापौरांकडे निवेदनाव्दारे करण्यात आली़
राज्य शासनाने एलबीटी रद्द केला आहे़ त्यामुळे महापालिकेला एलबीटीच्या मोबदल्यात अनुदानही मिळते़ पण तरी मनपाकडून व्यावसायिकांना त्रास दिला जात आहे़ अनावश्यक कागदपत्रांची मागणी, वाढीव कर भरण्यास सांगतात़ कर भरला नाही तर दुकाने व माल सील करण्याची धमकी दिली जाते़ जेवढा जास्त कर भरला जाईल तेवढे अधिक कमिशन ठेकेदाराला मिळते़ अधिक रक्कम घेऊनही कमी रक्कमेची पावती दिली जाते़ त्यामुळे एलबीटी विवरण पत्र तपासणीचा ठेका रद्द करण्यात यावा, अशी मागणी मागणी समाजवादी पार्टीतर्फे महापौरांकडे निवेदनाव्दारे करण्यात आली़ यावेळी समाजवादी पार्टी मुलायमसिंग युथ ब्रिगेडचे प्रदेश महासचिव गोरख शर्मा, जिल्हाध्यक्ष अशपाक मिर्झा, उपाध्यक्ष राहूल भामरे, नबाब खान, इनाम सिद्दीकी, जाकीर खान, सागर चव्हाण, भूषण शिंदे, संदीप गायकवाड, अशोक निकम, राजकुमार व्यास, प्रशांत शर्मा, रफीक शाह, मोहसीन शेख, गुलाम कुरेशी, आरीफ मलीक, अकिल अन्सारी उपस्थित होते़