Due to the increasing temperature, many dangers of the body are possible | वाढत्या तापमानापासून शरीराला अनेक धोके संभव
dhule

धुळे : येत्या आठवड्या भरात उन्हाची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आह़े गेल्या अनेक वर्षांच्या तुलनेत या वर्षी उन्हाचा पारा वाढला असून तापमान ४६ अंशाच्या पुढे गेले आहे. वाढत्या उन्हापासून शरीराला अनेक धोके असल्याने काळजी घ्यावी अशी माहिती आयुर्वेद तज्ञ डॉ़एस़ टी़ पाटील यांनी दिली़ 
उन्हामुळे  उष्णतेचे, पित्ताचे, रक्ताचे, त्वचेचे विकार होण्याची शक्यता असते. सनस्ट्रोक, मेंदूला इजा पोहोचणे, थकवा यासारख्या आरोग्याच्या समस्या येउ शकतात़ उन्हापासून बचाव करण्यासाठी व थकवा घालवण्यासाठी वारंवार भरपूर पाणी पिणे, सोबत  कांदा ठेवणे, धण्याचे पाणी पिणे, लिंबू पाणी, पुदिन्याचे सरबत राण तुळशीच्या बियांचे सरबत,  उसाचा रस, काकडी, कोथिंबीर, मनुका, असे  उपाय आहेत. उन्हात काम झाल्यानंतर हातापायाची आग, भगभग, डोळ्यांची जळजळदाह, लाली, खोबरेल किंवा चांगले तूप; हातपाय, डोके, डोळ्यांच्या बाजूला हलक्या हाताने लावून जिरवणे  वाढत्या उन्हापासून आपण संरक्षण मिळवू शकतो़ बाहेर विक्रीसाठी असणारे शितपेय शरिरासाठी हाणीकार असल्याने अनेक आजारांना आमंत्रण न देतात असे डॉ़ पाटील यांनी सांगितले़ 

 दुपारी १२ वाजेपूर्वी बाहेरची कामे आटोपून घ्यावी. पांढरे व  सैल कपडे वापरावेत. मसालेदार पदार्थ खाणे टाळावेत. आहारात कांद्याचा समावेश असावा. शरीराचे तापमान स्थिर राहील यासाठी पाणी जास्त प्रमाणात प्यावे.
-डॉ़एस़टी़ पाटील ,
आयुर्वेद तज्ञ, धुळे 


Web Title: Due to the increasing temperature, many dangers of the body are possible
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.