नदीत बुडून धुळे जिल्ह्यातील दोघांचा मृत्यू

By Admin | Updated: July 3, 2017 12:06 IST2017-07-03T12:06:13+5:302017-07-03T12:06:13+5:30

जिल्ह्यात दोन जणांचा शनिवारी नदीत बुडून मृत्यू झाला.

Due to drowning in river Dhule, the death of both the people | नदीत बुडून धुळे जिल्ह्यातील दोघांचा मृत्यू

नदीत बुडून धुळे जिल्ह्यातील दोघांचा मृत्यू

 ऑनलाईन लोकमत

धुळे ,दि.3 - जिल्ह्यात दोन जणांचा शनिवारी नदीत बुडून मृत्यू झाला. दिग्विजय दीपक माळी (वय 15, बेटावद, ता. शिंदखेडा) आणि श्यामराव बाबूराव पाटील (56, रा. बाळदे, ता.शिरपूर) अशी मृतांची नावे आहेत. यापैकी दिग्विजय  हा शनिवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास बेटावद येथे पांझरा नदीत पाय घसरून थेट नदीपात्रातील विहिरीत बुडाल्याने मृत्युमुखी पडला. तो आपल्या मित्रासोबत तेथे खेळण्यासाठी गेलेला होता़ अगदी क्षणार्धात हा प्रकार घडल्याने त्याला काहीही सुचले नाही़   या घटनेची नोंद नरडाणा पोलीस ठाण्यात करण्यात आली आह़े दुस:या घटनेत बाळदे येथील श्यामराव पाटील यांचा शनिवारी सकाळी तापी नदीत बुडून मृत्यू झाला. ही दुर्घटना कशी घडली ते कळू शकलेले नाही. यासंदर्भात शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े 
 

Web Title: Due to drowning in river Dhule, the death of both the people