शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
2
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
3
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
4
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
5
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
6
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
7
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
8
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
9
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
10
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
11
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
12
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."
13
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
14
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
15
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
16
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
17
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
18
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
19
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
20
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!

आठवडे बाजारावर दुष्काळाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 11:33 IST

वरुळ : पालेभाज्यांची आवक घटली; भाव वधारल्याने ग्राहकांची संख्या रोडावली

तहाडी : शिरपूर तालुक्यातील वरुळ, भटाणे, जवखेडा, तºहाड, तºहाडीसह परिसरात मागीलवर्षी पावसाने पाठ फिरवल्याने नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये परिसरातील विहिरी, साठवण तलाव, कूपनलिका आटल्या आहेत़ त्यामुळे शेतकºयांनी नव्याने पालेभाज्यांची लागवड केली नाही़  येथील मगंळवारच्या आठवडे बाजारात पालेभाज्यांची आवक कमी झाली आहे़ त्याच बरोबर या पालेभाज्यांचे दरही गगनाला भिडले आहेत़  त्याची छाया वरूळ येथील मंगळवारी आठवडे बाजारावर पडली असल्याचे पहावयास मिळाले़ एरवी बाजारपेठेत ग्रामीण भागातील बाजार करणाºयांची अधिक गर्दी असते़ परंतु मंगळवारी बाजार करणाºयांची संख्या रोडावली असल्याचे दिसून आले़  तसेच उलाढालही कमी झाल्याचे व्यापारी, शेतकºयांनी सांगितले़  शेतकरी व शेतमजुरांच्या हाताला काम नसल्याने शेतकरी व शेतमजूर आर्थिक चणचणीत असल्याने याचा परिणाम आता बाजारपेठेवरही होऊ लागला आहे़ वरूळचा मंगळवारचा आठवडे बाजार म्हटले की, खेड्यापाड्यातील नागरिकांची भाजीपाला खरेदीसाठी गर्दी असते़  ही गर्दी सकाळपासून ते सायंकाळपर्यंत कायम असते़  मात्र, मंगळवारी दुपारच्या वेळी आठवडे बाजारात फेरफटका मारला असता ग्राहकांची तुरळक गर्दी दिसून आली़. एकूण ग्राहकांचा विचार केला असता भाजीपाला व कापड दुकानांची संख्याच जास्त दिसून आली. आठवडे बाजाराचा मुख्य घटक म्हणून पालेभाज्या विक्रेत्यांकडे पाहिले जाते़   तुरळक गर्दीचा सर्वाधिक फटका या विक्रेत्यांना बसला़. बाजारच्या अनुषंगाने अनेक विक्रेते ठोक स्वरुपात पालेभाज्या खरेदी करतात़ दिवसभर हा माल विक्री केल्यानंतर हातात अल्प रक्कम राहत आहे़  दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने खेडेगावातून येणाºया ग्राहकांची संख्या रोडावली आहे़. परिणामी विक्रेत्यांना माल विक्रीसाठी काही वेळेस दरही काही प्रमाणात कमी आकारावा लागत आहे़  तसेच बाजार परिसरातील हॉटेल्समध्ये एरवी होणारी ग्राहकांची गर्दीही कमी झाली असल्याचे दिसून आले़  दुष्काळी परिस्थितीची छाया संपूर्ण आठवडे बाजारावर पडली असल्याने काही व्यावसायिक ग्राहकांच्या प्रतीक्षेत असल्याचे पहावयास मिळाले़. त्यात भाज्यांचे भावही वाढल्याने बाजारावर परिणाम दिसूत येत आहे.

टॅग्स :Dhuleधुळे