लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळनेर : सामोडे-साक्री रस्त्यावरील म्हसदी फाट्यावर उसाच्या ट्रकला विद्युत तारेचा शॉक लागल्याने करंट उतरून चालक जागीच ठार झाला़ ही घटना सोमवारी दुपारी घडली आहे़ दिवाळीत अशा प्रकारची दुर्देवी घटना घडल्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात आली़ सोमवारी दुपारी एक ते दोन वाजेच्या सुमारास सामोडे शिवारातील माधवराव कृष्णा घरटे यांच्या शेतातील ऊस द्वारकाधीश कारखान्याला तोडून घेऊन जात असताना शेतातून म्हसदी फाट्याजवळ इरिगेशन कॉलनी जवळून सामोडे साक्री रोडवर ट्रक येत असताना चालक विजय पोपट पाटील (रा.हरिओम नगर, पिंपळनेर) यांना ३३ केव्ही मेगा लाईनच्या तारांचा अंदाज आला नाही व उसाचा भरलेला एमएच १५ बीजे ३४५८ या क्रमांकाच्या ट्रकला बांधलेला तारचा स्पर्श मेन लाईनला झाला़ त्यामुळे पूर्ण ट्रकमध्ये वीज प्रवाह उतरला़ त्यात चालक विजय पोपट पाटील हे जागीच ठार झाले. यावेळी सुदैवाने उसाच्या ट्रकवर ऊस भरणारे मजूर नव्हते़ नाहीतर त्यांनाही प्राण गमवावे लागले असते. घटनेची माहिती मिळताच अभियंता माळी यांनी विद्युत पुरवठा बंद करून ट्रक बाजूस नेण्यास सांगितले़ या घटनेत चालक पाटील यांना तारांचा अंदाज आला नाही व ट्रक तसाच नेताना तार लागल्याने विद्युत करंट उतरल्याचे त्यांनी सांगितले़ चालक विजय पाटील यांना पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. घटनेची माहिती गावात कळताच सर्वत्र शोककळा पसरली़ दिवाळी सणा वेळी अशी घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे. विजय पाटील यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, दोन मुली, भाऊ असा परिवार होता.
उसाच्या ट्रकमध्ये करंट उतरल्याने चालक जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 19:25 IST
पिंपळनेर : परिसरात व्यक्त होतेय हळहळ
उसाच्या ट्रकमध्ये करंट उतरल्याने चालक जागीच ठार
ठळक मुद्देऊसाच्या ट्रकमध्ये उतरला विजेचा प्रवाहचालकाचा जागीच मृत्यू झाल्याने हळहळ