विजेचा ट्रान्सफाॅर्मर जळल्याने पिके जळू लागली देऊर शिवारातील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:17 AM2021-01-24T04:17:39+5:302021-01-24T04:17:39+5:30

धमाने - धुळे तालुक्यातील देऊर येथील देऊर नेर रोड शिवारातील विजेचा ट्रान्सफाॅर्मर वेळोवेळी खराब होत असल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली ...

Due to burning of power transformer, crops started burning | विजेचा ट्रान्सफाॅर्मर जळल्याने पिके जळू लागली देऊर शिवारातील प्रकार

विजेचा ट्रान्सफाॅर्मर जळल्याने पिके जळू लागली देऊर शिवारातील प्रकार

Next

धमाने - धुळे तालुक्यातील देऊर येथील देऊर नेर रोड शिवारातील विजेचा ट्रान्सफाॅर्मर वेळोवेळी खराब होत असल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली रब्बी पिके पाण्याअभावी होरपळून निघाली आहेत. त्यामुळे तत्काळ येथे ट्रान्सफाॅर्मर बसविण्यात यावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देऊर येथील शेतकऱ्यांनी दिला आहे. देऊर नेर रोडवर देऊर शहरातील अनेक शेतकऱ्यांची शेती आहे. सध्या विहिरींना चांगल्या प्रमाणात पाणी असल्याने मोठ्या प्रमाणात रब्बी पिके गहू, हरभरा, भुईमूग, कांदे यांची लागवड करण्यात आली आहे. या पिकांना वेळोवेळी पाणी देणे आवश्यक आहे. सध्या ही पिके ऐन भरात असतानाच या शिवारातील ट्रान्सफाॅर्मर हा बसविल्यानंतर दोन-तीन दिवसातच नादुरुस्त होतो आणि नादुरुस्त झालेला ट्रान्सफाॅर्मर पुढील आठ-दहा दिवस दुरुस्त करून बसवला जात नाही. अशा परिस्थितीत एका बाजूला विजेचे भारनियमन व दुसऱ्या बाजूला बिघडलेला ट्रान्सफाॅर्मर यामुळे शिवारातील रब्बी पिके भरात असतानाच पाण्याअभावी सुकू लागली आहेत. दरम्यान, येथे ट्रान्सफाॅर्मर बसविण्यासाठी शेतशिवारातील शेतकरीच आपापल्यापरिने पैसे रूपाने वर्गणी गोळा करून ट्रान्सफाॅर्मर बसण्यासाठी आर्थिक तरतूद करण्याचा प्रयत्न करतात. तरीसुद्धा ट्रान्सफाॅर्मर तत्काळ बसवला जात नाही, अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे. जर का पिकांना तत्काळ पाणी दिले गेले नाही तर हातातोंडाशी आलेला रब्बी पिकांचा हंगामही जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी याकडे तत्काळ लक्ष देऊन चांगल्या प्रतीचा ट्रान्सफाॅर्मर बसवावा, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदनही महावितरणच्या नेर येथील कार्यालयात देण्यात आले आहे.

Web Title: Due to burning of power transformer, crops started burning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.