खडीमुळे वाहन चालविणे झाले जिकरीचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 12:18 IST2020-06-20T12:17:48+5:302020-06-20T12:18:24+5:30
धुळे : जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानासमोर रस्त्यासाठी टाकलेली आहे खडी

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे :येथील जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानासमोरील रस्त्याचे काम करण्यासाठी खडी टाकलेली असून अद्याप डांबरीकरण करण्यात आलेले नाही. त्यामुळे या रस्त्यावरून वाहन नेतांना चांगलीच कसरत करावी लागत आहे.
जुन्या सिव्हील रूग्णालय ते जिल्हाधिकाºयांचे निवासस्थान दरम्यान असलेल्या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झालेली होती.
गेल्या काही महिन्यापासून हा रस्ता तयार करण्यासाठी खडी टाकलेली आहे. मात्र या खडीवरून वाहन चालवितांना वाहनधारकांचा चांगलीच कसरत करावी लागत होती. खडीवरून वाहन नेल्याने लहान वाहने पंक्चर होत आहेत.
आता संथगतीने या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू झाले आहे. मात्र काम करतांना त्याठिकाणी कुठलेही बॅरिकेटस अथवा रस्त्याचे काम सुरू असल्याबाबतची सूचना फलक न लावता, वाहने आडवे लावून रस्ता बंद करण्यात आला.
त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जुन्या सिव्हिल रूग्णालयाकडे जाणाºया वाहनधारकांना चांगलाच अडचणीचा सामना करावा लागतोय.रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम त्वरित करण्याची मागणी होऊ लगली आहे.