धुळे येथे बस चालकास रिक्षा चालकांकडून मारहाण

By Admin | Updated: April 8, 2017 10:40 IST2017-04-08T10:40:17+5:302017-04-08T10:40:17+5:30

रिक्षा लावण्यावरून वाद झाल्याने बस चालक आर.डी. कोकरे यांना पाच रिक्षा चालकांनी मारहाण केली.

The driver of the bus driver rushed to Dhule | धुळे येथे बस चालकास रिक्षा चालकांकडून मारहाण

धुळे येथे बस चालकास रिक्षा चालकांकडून मारहाण

बस चालकांचे चक्का जाम आंदोलन : तासभर वाहतूक खोळंबली
धुळे, दि. 8 - शहरातील मध्यवर्ती बस स्थानकावर शनिवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास रिक्षा लावण्यावरून  वाद झाल्याने बस चालक आर.डी. कोकरे  यांना  पाच रिक्षा चालकांनी मारहाण केली. त्या मारहाण करणारे फरार झाले. या घटनेच्या निषेधार्थ बस चालकांनी चक्का जाम केला.  शेवटी बस स्थानकावरील   अधिकारी व उशिरा दाखल झालेल्या पोलिसांनी  मध्यस्थी केल्यानंतर बस चालकांनी आंदोलन मागे घेतले. सुमारे तासाभराने वाहतूक सुरळीत झाली.

Web Title: The driver of the bus driver rushed to Dhule