झोपडीतील गरिबांचे पक्क्या घरांचे स्पप्न होतेय साकार...प्रधानमंत्री आवास योजनेच्या निधीतून घरकुलांची कामे प्रगतीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:24 IST2021-07-20T04:24:42+5:302021-07-20T04:24:42+5:30
१०३०२ घरकुलांचे थकले अनुदान जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेचे अनुदान थकल्याने १० हजार ३०२ घरकुलांचे काम अपूर्ण आहे. निधी वितरित ...

झोपडीतील गरिबांचे पक्क्या घरांचे स्पप्न होतेय साकार...प्रधानमंत्री आवास योजनेच्या निधीतून घरकुलांची कामे प्रगतीत
१०३०२ घरकुलांचे थकले अनुदान
जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेचे अनुदान थकल्याने १० हजार ३०२ घरकुलांचे काम अपूर्ण आहे. निधी वितरित करण्याचे काम आता थेट मंत्रालयातून होत असल्याने कोणत्या लाभार्थीला कितवा हप्ता मिळाला आणि मिळाला नाही, याची आकडेवारी मिळू शकली नाही. निधीसाठी प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा सुरू आहे.
मोफत वाळू मिळेना, साहित्यही महागले!
या योजनेसाठी मोफत वाळू दिली जाते. ती मिळत नाही. शिवाय साहित्यही महागले आहे. मिळालेल्या पैशातून घर पूर्ण होत नाही. गाठीचे पैसे टाकावे लागतात. त्यामुळे शासनाने अनुदान वाढवून द्यावे, अशी लाभार्थींची मागणी आहे.
टप्प्याटप्प्याने अनुदान मिळत असल्याने घराचे काम संथ गतीने चालते. शिवाय मिळणारे अनुदान पुरेसे नसल्याने स्वत:चे पैसे खर्च करावे लागतात. पैसे नसले, तर काम रखडते. त्यामुळे घरकुलांसाठी अनुदान वाढवून मिळावे तसेच तीन हप्त्यांचे अनुदान एकत्रित द्यावे.
-गोकुळ बच्छाव, मालपूर (ता. शिंदखेड)
कोरोना काळातदेखील घरकुलांची कामे नियमितपणे सुरू होती. घरकुलांचे अनुदान वितरित होत असल्याने धुळे जिल्ह्यात घरकुलांच्या कामाची प्रगती चांगली आहे. उर्वरित घरकुलेदेखील लवकरच पूर्ण होतील. अनुदान वितरित करण्यासाठी शासनाने स्वतंत्र कक्ष सुरू केला आहे. - बी. एम. माेहन, प्रकल्प संचालक