श्रीकृष्णांवरील नाटिकेने वेधले लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 21:42 IST2019-12-29T21:41:45+5:302019-12-29T21:42:04+5:30

शिंदखेडा : व्ही.के. पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम

Dramatic attention paid to Sri Krishna | श्रीकृष्णांवरील नाटिकेने वेधले लक्ष

Dhule

धुळे : शिंदखेडा येथील व्हीक़े़पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळेतील चिमुकल्यांनी ‘वृंदावन थिम’अंतर्गत श्रीकृष्णांवर आधारीत नृत्य व नाटिका सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले़
शाळेच्या प्रांगणात सांस्कृतिक कला महोत्सवाचे उद्घाटन माजी पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आले़ यावेळी नगराध्यक्षा रजनी वानखेडे, ललिता देसले, हैदरभाई नुराणी, अहिंसा गु्रपचे चेअरमन राजेश मुणोत, शहाद्याचे डॉ़सचिन चौधरी, बोहरा सेंट्रल स्कूलचे चेअरमन सुरेंद्र बोहरा, माजी सभापती व्यंकट भगा पाटील, व्हीक़े़पाटील इंटरनॅशनल स्कूलच्या चेअरमन ममता विश्वास पाटील, संचालिका काजल पाटील, राज पाटील, माधुरी होळकर, रोहित होळकर, प्राचार्या रेणू मिश्रा तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते़
यानंतर ‘वृंदावन’ या थीमवर श्रीकृष्ण अवतार, कालिका मर्दन, असुर संहार, कुब्जा, मख्खनचोर, यमुनाजळी, कुरूक्षेत्र, गितादर्शन यावर आधारीत नृत्य व नाटीका सादर करण्यात आल्यात़ कृष्ण जीवनावर आधारीत विविध घटना व प्रसंग सादर करुन प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले़ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशा सोनवणे यांनी केले़

Web Title: Dramatic attention paid to Sri Krishna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे