डॉ़ तात्या लहाने चित्रपटात चहावाल्याची भूमिका साकारली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 22:41 IST2020-03-07T22:41:01+5:302020-03-07T22:41:33+5:30
चंद्रकांत सोनार । लोकमत न्यूज नेटवर्क ‘तेंडल्या निघाला आॅस्करला’ या चित्रपटासाठी कलावंत पाहीजेत, अशी जाहिरात इलेक्टॉनिक्स मीडियावर झळकली होती़ ...

dhule
चंद्रकांत सोनार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
‘तेंडल्या निघाला आॅस्करला’ या चित्रपटासाठी कलावंत पाहीजेत, अशी जाहिरात इलेक्टॉनिक्स मीडियावर झळकली होती़ ही जाहीरात पाहताच न घाबरता मुंबईत पहिल्यांदा चित्रपटात करीअर करण्यासाठी पाऊल टाकले़ मेहनत व जिद्द मनात असल्याने माझे या चित्रपटात सिलेक्शन झाले आणि आज अहिराणी, मराठी व हिंदी भाषेतील चित्रपटात काम केले़ लवकरच माझा ‘झांगडू’ हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे खान्देशी कलावंत भटू चौधरी यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले़
प्रश्न : आगामी झांगडू चित्रपटाचे चित्रीकरण कुठे झाले?
उत्तर : योगेश ढोकणे निर्मित्त झांगडू हा मराठी चित्रपट येत्या तीन महिन्यात रिलीज होणार आहे़ या चित्रपटात माझी मुख्य भुमिका आहे़ झांगडू या चित्रपटाचे चित्रीकरण करमाळा, अहमदनगर, बारामती, सातारा, पुणे व कोल्हापुर येथे झाले आहे़ या चित्रपटाचे पोस्टर अनावरण नुकतेच राहूरी येथे झाले आहे़
प्रश्न : आतापर्यत किती व कोणत्या चित्रपटात भुमिका साकारली आहे़?
उत्तर : आतापर्यत राजभाषा, हलके-फुलके, पाशबंध, सार्थक, झागंडू, डॉ़ तात्या लहाणे, ड्रिम जॉब, बे दुणे चार अशा १० ते १२ मराठी, हिंदी व अहिराणी चित्रपटांसह शार्ट फिल्म, खान्देशी गाणे, नाटीका, तारक मेहता का उलटा चष्मा अशा चित्रपट व मालिकेत भुमिका साकारली आहे़ तसेच चित्रपटात करीअर म्हणुन पाहणाऱ्या खान्देशातील अनेक कलावतांना चित्रपट व नाटकात काम करण्याची संधी मिळवून दिली आहे़
प्रश्न : करीअर करण्याची संधी कशी मिळाली?
उत्तर : मनापासुन जिद्द होती़ प्रा़ अनिल सोनार यांच्या माध्यमातून मला नाटकात काम करण्याची संधी मिळाली़ आजपर्यत मराठी अभिनेता मकरंद अनासपूरे, निशिगंधा वाड, राजेश्वरी खरात, विजय चव्हाण, रमेश देव, अलका कुबल, नंदिता धुरी, कुशल बद्रिके आदींसह मला काम करण्याची संधी मिळाली आहे़
प्रशासनाचे कलावंताकडे दुर्लक्ष
जिल्ह्यात कलेच्या माध्यमातून कुुटुंबाचा उदरनिर्वाह भागविणारे सुमारे १०० ते १५० कलांवत आहे़ कलावंताना एकत्र येण्यासाठी कलामंथन गु्रप तयार केला आहे़ शासनाने नाट्यप्रेमी व कलावतांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे, यासाठी धुळ्यात नाट्यमंदिर निर्माण केले आहे़ मात्र नाट्यमंदिर व्यावसायिक झाले आहे़ त्यामुळे कलावंतांना भाडे परवडत नाही़ त्यामुळे कलावंताना व्यासपीठ मिळत नाही़
क्रीडापटूंचा गौरव
धुळे : महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय शिवछत्रपती क्रिडा पुरस्कार प्राप्त तायक्वांदोपटू निरज दिलीप चौधरी आणि कोच प्रविण बोरसे यांना शनिवारी कल्याण भवनात धुळे जिल्हा तायक्वांदो असोसिएशनच्या वतीने सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले़ तसेच राष्ट्रीय खेळाडू समृध्दी दरवाडे, राज्यस्तरीय खेळाडू प्रेरणा जगताप, दिव्या जाधव, वृंदाराज शिरके, उन्नती चव्हाण, प्रणव नाचरे, जितू पाटील, दर्शन पाटील, अश्लेषा जोशी, गितांजली ईशी, देवयानी मोरे, हर्षाली विसपुते, आदी खेळाडूंचा सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला़