धुळयाचे डॉ़ रवि वानखेडकर यांनी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा कार्यभार स्विकारला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 22:00 IST2017-12-28T21:59:37+5:302017-12-28T22:00:43+5:30
मुंबईत कार्यक्रम : ‘आयएमए’च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड

धुळयाचे डॉ़ रवि वानखेडकर यांनी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा कार्यभार स्विकारला
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : धुळयाचे सुप्रसिध्द डॉ़ रवि वानखेडकर यांची इंडियन मेडिकल असोसिएशनच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली आहे़ अंधेरीतील हॉटेल ललितच्या मॅजेस्टिक हॉलमध्ये गुरूवारी दुपारी झालेल्या कार्यक्रमात त्यांनी मावळते अध्यक्ष डॉ़ के़ के़ अग्रवाल, जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष डॉ. केतन देसाई यांच्याहस्ते ‘आयएमए’च्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा कार्यभार स्विकारला़ यामुळे धुळयाला राष्ट्रीय स्तरावर सन्मान मिळाला आहे़
जिल्ह्यातील गरिबी, मागासपणा आणि आरोग्यविषयक समस्या लक्षात घेऊन त्यांनी आपल्या सेवेची खरी गरज या भागात असल्याचे मानून कार्याला सरूवात केली. डॉ़ वानखेडकर यांनी श्री भाऊसाहेब हिरे वैद्यकीय शासकीय महाविद्यालयात देखील मानद प्राध्यापक म्हणून सेवा दिली़ वैद्यकीय सेवा देताना त्यांनी व्यावसायिकांच्या समस्या, त्यांचे प्रश्न जाणून सोडविणे व त्यांचे संघटन वाढविण्यासाठी २००३ पासून ‘आयएमए’त सक्रीय सहभाग घेतला़ या संघटनेचे ते ८९ वे राष्ट्रीय अध्यक्ष ठरले असून त्यामुळे धुळयाला राष्ट्रीय सन्मान मिळाला आहे़