डॉ. प्रेमसिंग गिरासे यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:37 IST2021-09-11T04:37:11+5:302021-09-11T04:37:11+5:30
शिंदखेडा तालुक्यातील दराणे येथील डॉ. प्रेमसिंग गिरासे यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. चोरीच्या उद्देशाने भर दुपारी डॉ. प्रेमसिंग गिरासे ...

डॉ. प्रेमसिंग गिरासे यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी
शिंदखेडा तालुक्यातील दराणे येथील डॉ. प्रेमसिंग गिरासे यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. चोरीच्या उद्देशाने भर दुपारी डॉ. प्रेमसिंग गिरासे यांच्यावर हल्ला करून त्यांची हत्या करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात संतप्त वातावरण आहे. हल्ल्यात मृत पावलेले डॉ. प्रेमसिंग गिरासे यांच्या कुटुंबीयांची राजपूत समाजाचे अध्यक्ष डॉ. दरबारसिंह गिरासे तसेच महाराष्ट्र सेवा फाउंडेशनचे राज्य अध्यक्ष गिरीश परदेशी यांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले व घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. दरम्यान आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे. मृत झालेले डाॅ. प्रेमसिंग गिरासे यांना लवकरात लवकर न्याय मिळावा म्हणून याबाबतचे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून त्यांना न्याय मिळवून द्यावा आणि हल्लेखोर आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी जिल्हा राजपूत समाज, करणी सेना, शिवराणा ग्रुप महाराष्ट्र राज्यच्या वतीने एका निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी निवासी जिल्हाधिकारी जगदाळे यांना या मागणीचे निवेदन देण्यात आले. ज्यावेळी जिल्हा राजपूत समाजाचे अध्यक्ष डॉ. दरबारसिंह गिरासे, अ.भा. क्ष. महासभेचे उपाध्यक्ष प्रा. जसपालसिंग सिसोदिया, करणी सेनेचे राष्ट्रीय प्रवक्ते दिनेशसिंह जाधव, दादा कोर, अजित राजपूत, प्रा. विजय सिसोदिया, तेजपालसिंह गिरासे, मंजितसिंह सिसोदिया, अभिराज परदेशी, सचिन राजपूत, दिनेश जाधव, डाॅ. जयदीप जाधव, बापू पैलवान पाथरे, पंकज राजपूत, जयदीप राजपूत, जगदीश राणा, विकास भामरे, हर्षल गिरासे, दिग्विजयसिंह गिरासे, विजयसिंह ठोके, भोपाल राजपूत यांच्यासह विविध संघटना व संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.