उमवि मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. देवरे यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:41 IST2021-09-15T04:41:51+5:302021-09-15T04:41:51+5:30
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात अभियांत्रिकींतर्गत विविध अभ्यासक्रम शिकविले जातात. यात इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन आणि इंडस्ट्रिअल इलेक्ट्रॉनिक्स या अभ्यासक्रम मंडळाच्या ...

उमवि मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. देवरे यांची निवड
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात अभियांत्रिकींतर्गत विविध अभ्यासक्रम शिकविले जातात. यात इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन आणि इंडस्ट्रिअल इलेक्ट्रॉनिक्स या अभ्यासक्रम मंडळाच्या अध्यक्षपदी या स्वायत्त महाविद्यालयाचे उपसंचालक डॉ. प्रमोद देवरे यांची निवड झाली आहे. डॉ. देवरे यांनी यापूर्वी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सिनेट सदस्य, अभ्यासक्रम मंडळाचे सदस्य म्हणून यशस्वीरीत्या काम केले. सध्या ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठात सहयोगी अधिष्ठाता, तसेच अभ्यासक्रम मंडळाचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत. डॉ. देवरे यांनी अभियांत्रिकी व तंत्रज्ञानातील विविध विषयांवर ११ पुस्तके प्रकाशित झालेली असून, आंतरराष्ट्रीय स्तरावरील जर्नल्समध्ये ५५, तर राष्ट्रीय स्तरावरील जर्नल्समध्ये ६ शोधनिबंधही प्रकाशित झालेले आहेत. जानेवारी २०२० मध्ये इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स (इंडिया)तर्फे इंजिनिअरिंग अचिव्हमेंट हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.