अति उत्साहात निर्णय घेऊ नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:41 IST2021-08-12T04:41:10+5:302021-08-12T04:41:10+5:30
शिरपूर येथे गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरवप्रसंगी धुळे जि.प. अध्यक्ष डॉ़ तुषार रंधे शिरपूर : गेल्या दीड-दोन वर्षापासून कोरोनाशी सामना ...

अति उत्साहात निर्णय घेऊ नका
शिरपूर येथे गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरवप्रसंगी धुळे जि.प. अध्यक्ष डॉ़ तुषार रंधे
शिरपूर : गेल्या दीड-दोन वर्षापासून कोरोनाशी सामना करतोय़ परीक्षा होऊन चांगले गुण मिळालेत़ ‘विद्यार्थ्यांचे करिअरला सुरुवात होत असतांना प्रेझेंटेशनला जातांना कोरोनाचा देखील ड्रॉ बॅक असणार आहे़ तो ड्रॉ बॅक म्हणजेच कोरोनाचा काऴ. मात्र यावर विद्यार्थ्यांना आता मात करावी लागणार आहे़ भविष्यात काय करिअर करावयाचे आहे, आपल्याला कोणत्या दिशेने जायचे आहे त्याचा बारकाईने अभ्यास करणे आवश्यक आहे़ चांगले गुण मिळाले म्हणून गर्भित होऊ नका, त्याच्याकरिता अजून मेहनत करावयाची आहे़ अतिउत्साहात निर्णय घेऊ नका अन्यथा नैराश्य पत्कारावे लागते़ नैराश्य सोडून द्यावयाचे असून उत्साह कायम टिकवायचा आहे़ त्याकरिता येणाऱ्या काळात मिळालेल्या गुणांशी स्वत: तुलना करा. तसे केल्यास कोणतीही परीक्षा आपल्याला हरवू शकत नाही, असे प्रतिपादन धुळे जि.प़ अध्यक्ष तथा किविप्र संस्थेचे अध्यक्ष डॉ़ तुषार रंधे यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या १२ वी वर्गातील २५० विद्यार्थ्यांचा गुणगौरवप्रसंगी मार्गदर्शन करतांना केले़
१० रोजी येथील एस़पी़डी़एम़ कॉलेजच्या कर्मवीर दालनात संस्थेच्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयात एचएससी परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन करणाऱ्या प्रथम टॉप थर्टीन आलेल्या एकूण २५० विद्यार्थ्यांचा गुणगौरवाचा कार्यक्रम धुळे जि. प़ अध्यक्ष तथा किविप्र संस्थेचे अध्यक्ष डॉ़ तुषार रंधे यांच्या उपस्थितीत करण्यात आला़
यावेळी संस्थेचे सचिव निशांत रंधे, कोषाध्यक्षा आशाताई रंधे, विश्वस्त व कुलसचिव रोहित रंधे, माजी जि. प़ सदस्या सीमा तुषार रंधे, विश्वस्त आनंदसिंग राऊळ, विश्वस्त श्यामकांत पाटील, सेवानिवृत्त प्राचार्य डॉ़ एस़ एन. पटेल, प्राचार्य महेश पवार, प्रभारी प्राचार्य डॉ़ व्ही़ एम़ पाटील, उपप्राचार्य डॉ. बागुल, उपप्राचार्य पी़ जी़ पारधी, उपप्राचार्य एस़ टी़ ठाकरे, डॉ.कादरी, संजय निकम, प्रा.रोकडे, प्रा़ शोभा पाटील, प्रा़ प्रशांत पाटील, प्रा. आर. क़े़ पाटील, प्रा. कोळी, प्रा़ अविनाश पाटील, व्यवस्थापक आनंदराव पाटील, किशोर बच्छाव आदी उपस्थित होते.
धुळे जि. प़ अध्यक्ष डॉ़ तुषार रंधे म्हणाले, विद्यार्थ्यांनी यशामुळे हुरळून न जाता अधिक जोमाने अभ्यास करून आपली गुणवत्ता सिद्ध करावी. येणारा काळ अधिक आव्हानात्मक आहे. कोरोना काळात परीक्षा होऊ शकल्या नाहीत म्हणून या गुणवंतांना कुणीही कमी लेखू नये. गुणवत्तेच्या शिखरावर आता मुलांची संख्या दिवसेंदिवस घटत असताना मुलींची संख्या वाढत आहे़ ही विषमता दूर करण्यासाठी संबंधित प्राध्यापकांनी आत्मचिंतन करणे गरजेचे आहे़ शिक्षणाबरोबर सामाजिक भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचे काम देखील केले पाहिजे़ पुढील जीवनात अधिक यश मिळो, अशा सदिच्छा त्यांनी दिल्या.
गुणवंत विद्यार्थ्यांपैकी सानिका जोशी, प्राची पाटील, पराग पाटील व इतर विद्यार्थ्यांनी मनोगतातून संस्था महाविद्यालय व गुरुजनांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. संस्थेतील १७ कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील गुणवंतांचा गौरव करण्यात आला़ विशेष म्हणजे शहरातील मौलाना आझाद उर्दू शाळेतील टॉप थर्टीन ठरलेल्या सर्वच्या सर्व १३ मुलींचा विशेष गौरव डॉ़ रंधे यांनी केला़
प्रास्ताविक प्राचार्य डॉ़ व्ही़ एम़ पाटील, सूत्रसंचालन प्रा़ प्रशांत पाटील तर उपप्राचार्य प्रा़ ठाकरे यांनी आभार मानलेत़