गावात विनाकारण लोकांना फिरू देऊ नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:35 AM2021-04-10T04:35:13+5:302021-04-10T04:35:13+5:30

बळसाणे : माळमाथा भागातील बळसाणे गावात तहसीलदार प्रवीण चव्हाणके यांनी गुरूवारी ग्रामपंचायतीला भेट दिली. यावेळी लोकनियुक्त सरपंच दरबारसिंग ...

Don't let people roam the village for no reason | गावात विनाकारण लोकांना फिरू देऊ नका

गावात विनाकारण लोकांना फिरू देऊ नका

Next

बळसाणे : माळमाथा भागातील बळसाणे गावात तहसीलदार प्रवीण चव्हाणके यांनी गुरूवारी ग्रामपंचायतीला भेट दिली. यावेळी लोकनियुक्त सरपंच दरबारसिंग गिरासे यांच्याकडून कोविडसंदर्भात माहिती घेत तहसीलदार चव्हाणके यांनी गावात कोरोनाचा एकही रुग्ण नसल्याबद्दल समाधान व्यक्त केले. गावात जंतुनाशक फवारणी वारंवार करा, गावात रिकाम्या लोकांना फिरू देऊ नका, किराणा दुकानदाराकडे गर्दी होता कामा नये, अशा बारीकसारीक गोष्टींवर लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचनाही तहसीलदार चव्हाणके यांनी दिल्या.

गावात पंधराव्या वित्त आयोगातून निर्जंतुकीकरण करण्यासाठी नव्याने फवारणी मशीन आणले आहे. काही दिवसांनी गावातील गल्लीबोळात सॅनिटायझरचा वापर करत निर्जंतुकीकरण करणार आहोत. गावात घरोघरी जात सर्वेक्षण करणाऱ्या आरोग्य सेविका, आशा सेविका, अंगणवाडी सेविका व प्राथमिक शिक्षिका या कोरोना योद्ध्यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. यासाठी गावातील आरोग्य उपकेंद्राला ऑक्सिमीटर ७, तापमापक ७, चार हजार मास्क, १० हँडवाॅश व सॅनिटायझरचे कॅन भेट देण्यात आले. उपसरपंच महावीर जैन म्हणाले की, ‘डॉक्टर आपल्या दारी’ या मोहिमेला लवकरच आम्ही सुरुवात करणार आहोत. यावेळी पोलीसपाटील आनंदा हालोरे, ग्रामपंचायत सदस्य देविदास धनुरे, सुदाम खांडेकर, बापू माळचे यांच्यासह अन्य ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

Web Title: Don't let people roam the village for no reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.