डेंग्यू आजाराकडे दुर्लक्ष करू नका, निष्काळजी केल्यास होईल गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:42 IST2021-09-04T04:42:48+5:302021-09-04T04:42:48+5:30
शहरातील डेंग्यू व मलेरिया, तसेच चिकनगुनिया या आजारासंर्दभात शुक्रवारी आयुक्तांच्या दालनात मनपाच्या विभाग प्रमुखांची बैठक घेण्यात आली. यावेळी आयुक्त ...

डेंग्यू आजाराकडे दुर्लक्ष करू नका, निष्काळजी केल्यास होईल गुन्हा दाखल
शहरातील डेंग्यू व मलेरिया, तसेच चिकनगुनिया या आजारासंर्दभात शुक्रवारी आयुक्तांच्या दालनात मनपाच्या विभाग प्रमुखांची बैठक घेण्यात आली. यावेळी आयुक्त अजिज शेख, अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त गणेश गिरी, विनायक काेते, आरोग्यधिकारी डाॅ. महेश मोरे, सहायक आरोग्य अधिकारी चंद्रकांत जाधव आदी उपस्थित होते.
आरोग्य विभागाचा आढावा
शहरातील डेंग्यू आजाराच्या रुग्णसंख्येचा आढावा घेण्यात आला, तसेच यावर उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. शहरात गेल्या तीन महिन्यांपासून डेंग्यूचे रुग्ण वाढले आहेत. डेंग्यूवर नियंत्रण मिळविण्यासाठी मनपा आरोग्य व मलेरिया विभागाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. मात्र, त्यानंतरही रुग्णांची संख्या कमी हाेत नाही. त्यामुळे नागरिकांसह लोकप्रतिनिधींकडून प्रशासनावर खापर फाेडले जात आहे. काही नागरिक उघड्यावर पाणी साठवणे, छतावर भंगार साहित्य ठेवणे, टायर ठेवतात. त्यामुळे डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होते. ही बाब आरोग्य विभागाने घरोघरी केलेल्या सर्वेक्षणातून स्पट झाली आहे.