साहित्य खरेदीची सक्ती करू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 13:24 IST2020-06-07T13:24:04+5:302020-06-07T13:24:51+5:30

शिक्षणाधिकारी । सर्वसामान्य पालकांना दिलासा; मनविसे पाठपुरावा

Don't force the purchase of materials | साहित्य खरेदीची सक्ती करू नये

dhule


लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : कोरोना पार्श्वभूमीवर गेल्या अडीच महिन्यापासून लॉकडाऊन असल्याने अनेकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे़ अशातच शाळेकडून विद्यार्थ्यांच्या गणवेश, शालेय साहित्य खरेदीसाठी ठराविक दुकानातून विकत घेण्याची शक्ती पालकांना करू नये असा आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी दिला आहे़
जून महिना सुरू झाल्यानंतर शाळा व महाविद्यालयाच्या प्रक्रिया सुरू झालेल्या आहेत अनेक इंग्रजी माध्यमांच्या शाळा या आॅनलाइन वर्ग घेत आहेत़ त्यातच काही शाळा व महाविद्यालय शैक्षणिक साहित्य गणवेश ठराविक दुकानातून विकत घेण्याची सक्ती करत आहेत़ या अनुषंगाने शाळेकडून विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व इतर शैक्षणिक साहित्य ठराविक दुकानातून अथवा शाळेतून खरेदी करण्याची सक्ती केली जात होती़
शालेय गणवेश किंवा इतर शैक्षणिक साहित्य हे शाळेतून अथवा ठराविक दुकानातून घेण्याची सक्ती संस्था/शाळांनी विद्यार्थ्यांवर अथवा पालकांवर करू नये, शालेय दैनंदिन किंवा इतर शैक्षणिक साहित्य तसेच गणवेश बदलाबाबत शाळेतील पालक शिक्षक संघटनेच्या सर्वसाधारण सभेत सदर विषय निदर्शनास आणून त्या करिता होणारा खर्च व त्या विषयाची पालकांची मते जाणून घेऊनच त्याची अंमलबजावणी करावी, शालेय विद्यार्थ्यांना संगणक शिक्षणाची सुविधा निर्माण करून देताना शासन निर्णय व नियमानुसार कार्यवाही करावी, निदेर्शांचे संस्था/शाळा यांच्याकडून उल्लंघन होऊन विद्यार्थ्यांचे पालकांची तक्रार या कार्यात प्राप्त होणार नाही़ याबाबत दक्षता घ्यावी़ नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल असा आदेश जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ़ सुभाष बोरसे दिला आहे़ मनविसेच्या निवेदनाची दखल शिक्षणाधिकारी यांचे आभार मानले़ मनविसे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. प्रसाद सतीष देशमुख, गौरव गीते, हर्षल परदेशी, यश शर्मा, मनोज कोळी, विठ्ठल पगारे, प्रशांत व्यवहारे, गणेश चव्हाण, विजय जगताप, राहुल मराठे, गुरूराज पाटील, सत्यजित गिरासे आदी उपस्थित होते.

Web Title: Don't force the purchase of materials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे