‘कोरोना व्हायरस’ ची भिती मनात बाळगू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 13:46 IST2020-02-19T13:46:10+5:302020-02-19T13:46:56+5:30
धुळे : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातला असून अनेकांच्या मनात भिती निर्माण झाली आहे़ याच भितीपोटी कोरोनाची लागन होऊ ...

‘कोरोना व्हायरस’ ची भिती मनात बाळगू नका
धुळे : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातला असून अनेकांच्या मनात भिती निर्माण झाली आहे़ याच भितीपोटी कोरोनाची लागन होऊ नये, यासाठी अनेक जण घराबाहेर निघतांना मास्क लावून फिरत असल्याचे स्पष्ट झाले़ परंतू याची भिती मनात बाळगू नका, यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्यात आली असल्याची माहिती मनपा आरोग्य विभागातर्फे देण्यात आली. यासंदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी मराठी व उर्दू भाषेतील बॅनर शहरात लावण्यात येत आहे.
कोरोना व्हायरस कशाद्वारे होत आहे़ याबाबत नेमकी माहीती आजही प्राप्त झालेली नाही़ मात्र हवेतील ससंर्गजण्य विषाणूद्वारे या आजाराची लागण होते़ आजाराचे रूग्ण जरी नसले तरी नागरिकांनी काळजी घ्यावी पण भीती बाळगू नये, असे आवाहन महापालिका आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे़ नागरिकांनी कशा प्रकारे काळजी घ्यावी, यासाठी शहरात मुख्य ३० ते ४० ठिकाणी मराठी व उर्र्दु भाषेतील बॅनरद्वारे जनजागृती केली जाणार आहे़
मनपाकडून उपाय-योजनावर भर
कोरोना व्हायरस चा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कमी असली तरी सावधनता बाळगण्यासाठी मनपा आरोग्य विभागाला सज्ज राहण्याचे आदेश शासनाकडून प्राप्त झाले आहे़ आजाराचे लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय योजना, मनपाच्या दवाखान्यात येणाऱ्या सर्दी खोकला, किंवा संशयित रूग्णांना हिरे वैद्यकीय रूग्णालयात पाठविण्याची व्यवस्था केली आहे़ नागरिकांसोबतच वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना वैयक्तिक संरक्षणाची साधने उदा़ मास्क, हॅन्ड ग्लोज वापरण्याच्या सुचना केल्या आहेत.
व्यावसायिकांना फटका
कोरोना विषाणूचा फैलाव चिकनमधून होत असल्याच्या भितीने पोल्ट्री व्यवसायावर मंदीचे सावट पसरले आहे़
सार्वजनिक ठिकाणी दक्षता
शहरातील बस स्थानक, बॅका, चित्रपटगृह, रेल्वेस्टेशन, मार्केट अशा सार्वजनिक ठिकाण तसेच दुचाकीवरून प्रवास करणाºया नागरिकानी मास्क व तोंडाला रूमाल लावतांना दिसून येत आहे़
४१ आरोग्य केंद्र सज्ज
चारही तालुक्यात ४१ आरोग्य केंद्रात सुमारे १४०० कर्मचारी कार्यरत आहे़ अधिकारी व कर्मचाºयांना प्रशिक्षण देण्यात आले आहे़