दोंडाईचानजिक ट्रक रुग्णवाहिकेवर धडकला, ३ ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 17:45 IST2018-03-24T17:45:08+5:302018-03-24T17:45:08+5:30
दुर्घटना : नंदुरबारहून धुळ्याकडे येत असताना झाला अपघात

दोंडाईचानजिक ट्रक रुग्णवाहिकेवर धडकला, ३ ठार
ठळक मुद्देदोंडाईचा ते नंदुरबार रोडवरील घटनाट्रक आणि रुग्णवाहिकेचा अपघाततीन जणांचा जागीच मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
दोंडाईचा : दोंडाईचा नंदुरबार रस्त्यावर रूग्णवाहीका व खाजगी वाहन मालट्रक यांच्यात अपघात झाला़ यात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला़ ही घटना शनिवारी दुपारी घडली़
न्याहाली जवळील धाब्याच्या पुढे ही दुर्घटना घडली़ यात रूग्णवाहीकेतील भिकन बापू पवार, अनिल पंडीत गुरव (दोघे रा़ धुळे) आणि अंदरखाँ अब्दुलखाँ मकरानी (रा़ अक्कलकुवा) हे तीन जण जागीच ठार झाले आहेत. रूग्णवाहिका अक्कलकुवा येथील आहे़ ही रुग्णवाहिका नंदुरबार येथून धुळे येथे दुरुस्तीसाठी जात असताना ही घटना घडली़ सुदैवाने यात रुग्ण नव्हते़