दोंडाईचा राष्ट्रवादी काँग्रेसची पोलीस ठाण्यात तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:40 IST2021-09-05T04:40:28+5:302021-09-05T04:40:28+5:30
तक्रारीत म्हटले आहे की, देशातील वाढत्या महागाईविरोधात बसस्थानक, गर्ल्स हायस्कूल, गुरव रिक्षा थांबा, छत्रपती शिवाजी चौक आदी ठिकाणी निषेध ...

दोंडाईचा राष्ट्रवादी काँग्रेसची पोलीस ठाण्यात तक्रार
तक्रारीत म्हटले आहे की, देशातील वाढत्या महागाईविरोधात बसस्थानक, गर्ल्स हायस्कूल, गुरव रिक्षा थांबा, छत्रपती शिवाजी चौक आदी ठिकाणी निषेध बॅनर लागले होते. हे बॅनर आमदार रावल यांच्या सांगण्यावरून आमच्या संमतीशिवाय काढून नेले. लोकशाही मार्गाने सरकारच्या चुकीच्या धोरणांचा निषेध करणे हा नागरिकांचा कायदेशीर हक्क व अधिकार आहे. असे असताना आमदार रावल हे हुकूमशाही पद्धतीने शहरात वावरत असून, त्यांच्या बॅनर काढण्याच्या कृतीमुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. आम्ही कायद्याचा सन्मान करणारे असल्यामुळे आम्ही त्यांच्याविरोधात कायदेशीर तक्रार दाखल करीत आहोत; परंतु प्रत्येकवेळी असे कृत्य सहन करणार नाहीत. म्हणून त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पोलीस निरीक्षकांकडे करण्यात आली आहे.