दोंडाईचाकरांनी केली पूरग्रस्तांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:41 IST2021-08-17T04:41:24+5:302021-08-17T04:41:24+5:30
कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टी व इतर कारणाने पुरात फार मोठे नुकसान झाले. अनेकांचे संसार उघड्यावर पडले. शेकडो कुटुंबं बेघर झाली. ...

दोंडाईचाकरांनी केली पूरग्रस्तांना मदत
कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टी व इतर कारणाने पुरात फार मोठे नुकसान झाले. अनेकांचे संसार उघड्यावर पडले. शेकडो कुटुंबं बेघर झाली. गुरे-ढोरे वाहून गेली. शेतीत पाणी शिरल्याने पिकांचे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सामाजिक संस्थांना मदतीचे आवाहन केले आहे.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार धुळे येथेही कार्यरत होते. सामाजिक बांधिलकी म्हणून दोंडाईचा येथील पांडुरंग बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा सौ. पूजा नितीन खडसे यांनी कोल्हापूर पूरग्रस्तांना ५३ हजार रुपयांची मदत पाठवली आहे.
संस्थेच्या अध्यक्षा, राष्ट्रीय विश्वगामी ह्युमन राईट्स संघटनेच्या तालुकाध्यक्षा सौ. पूजा नितीन खडसे यांनी कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी राहुल रेखावार व धुळे येथील जिल्हाधिकारी जलाज शर्मा यांच्या मार्गदर्शनाने रोख आर्थिक मदत पाठविली आहे. ही रक्कम आरटीजीएसने पाठविण्यात आली आहे. पांडुरंग बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा सौ. पूजा नितीन खडसे, तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदतीने आवाहन केले आहे. त्या आवाहनाला प्रतिसाद देत सामाजिक बांधिलकी म्हणून पांडुरंग बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेमार्फत ५३ हजार रुपयांची रोख मदत दिली आहे.