दोंडाईचात दोन लाखांची घरफोडी, अज्ञातांविरूद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 11:44 IST2019-12-02T11:44:34+5:302019-12-02T11:44:50+5:30
रोख रक्कम, दागिने लंपास : चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

दोंडाईचात दोन लाखांची घरफोडी, अज्ञातांविरूद्ध गुन्हा
आॅनलाइन लोकमत
दोंडाईचा :दोंडाईचापासून जवळच असलेल्या विखरण येथे सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षकाकडे घरफोडीची घटना ताजी असतानाच दोंडाईचा पुन्हा घरफोडी झाली. चोरट्यांनी रोख रख्कम, सोने-चांदीचे दागिने असा एकूण १ लाख ८६ हजाराचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीसआली. याप्रकरणी दोडाईचा पोलिसात अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोडाईचा येथील राऊळनगरला वास्तव्यास असलेले अमृत जगन्नाथ लोणारी यांचे वडील मयत झाल्याने ते १८ ते ३० नोव्हेंबर दरम्यान ब्राम्हणगाव (ता. सटाणा) येथे गेले होते. ओतारी यांचे घर बंद होते.चोरट्यांनी त्यांच्या घराच्या खिडकीचे गज कापून आत प्रवेश केला. कपाटातून १ लाख ६० हजार रोख व २६ हजार रुपयांचे सोने चांदीचे दागिने असा १ लाख८६ हजार रूपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना ३० रोजी उघडकीस आली. रविवारी दोंडाईचा पोलिसात अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला. तपास पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांचा मार्गदर्शनखाली उपनिरीक्षक दिनेश मोरे करीत आहेत. दरम्यान दोंडाईचा परिसरात चोरीचे प्रमाण वाढले असून, चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.