दोंडाईचा : जायंट्स परिवार (क्लब) पदग्रहण समारंभ उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:43 IST2021-09-08T04:43:35+5:302021-09-08T04:43:35+5:30

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जायंट्सचे विश्व उपाध्यक्ष विजयकुमार चौधरी होते. प्रमुख पाहुणे म्हणून फेडरेशन २अ चे अध्यक्ष डाॅ. ...

Dondaicha: Giants family (club) inauguration ceremony in excitement | दोंडाईचा : जायंट्स परिवार (क्लब) पदग्रहण समारंभ उत्साहात

दोंडाईचा : जायंट्स परिवार (क्लब) पदग्रहण समारंभ उत्साहात

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जायंट्सचे विश्व उपाध्यक्ष विजयकुमार चौधरी होते. प्रमुख पाहुणे म्हणून फेडरेशन २अ चे अध्यक्ष डाॅ. संतोषकुमार मिश्रा, फेडरेशनचे माजी अध्यक्ष चंद्रकांत जाधव, फेडरेशनचे ऑफिसर भीमलिंग लिंभारे, श्रीमती प्रा. डाॅ. ईशरतबानो शेख, फेडरेशनचे डायरेक्टर रवींद्र चित्ते, स्पेशल इन्व्हायटी मेंबर रोहिणी लिंभारे, जायंट्स अध्यक्ष सुनील शिंदे, जायंट्स मिडटाऊन अध्यक्ष प्रशांत चितोडकर, जायंट्स सहेली ग्रुप अध्यक्ष कल्पना शेख, जायंट्स सहेली प्राईड अध्यक्ष इरम शेख, सुनीता गिरासे, दोंडाईचा न.पा.चे माजी उपाध्यक्ष रवी उपाध्ये, सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र गिरासे, प्रवीण महाजन, आदी होते.

फेडरेशनचे डायरेक्टर रवींद्र चित्ते यांच्या हस्ते चारही ग्रुपचे पदाधिकारी, सदस्य यांचा शपथविधी झाला. शपथ घेणारे नवीन अध्यक्ष, पदाधिकारी

१. जायंट्स ग्रुप अध्यक्ष संदीप देसाई, उपाध्यक्ष शशांक भावसार, महेश कुकरेजा, सचिव- भीमलिंग लिंभारे, खजिनदार- रामलिंग लिंभारे

२. जायंट्स मिडटाऊन- अध्यक्ष भरतसिंग गिरासे, उपाध्यक्ष सुरेश पाटील, सचिव कैलास राजपूत, महेंद्रसिंग गिरासे, खजिनदार अनिल पवार

३: जायंट्स सहेली प्राईड- अध्यक्षा राखी उपाध्ये, उपाध्यक्षा वैशाली अयाचित व बबली गुप्ता, सचिव सुवर्णा कुचेरीया, खजिनदार शिवानी गुप्ता

४. जायंट्स सहेली ग्रुप : अध्यक्षा रोहिणी लिंभारे, उपाध्यक्षा सुरेखा सिसोदिया व संजूषा मुनोत, सचिव सीमा टाटीया, खजिनदार योजना राजपूत आदींनी पदग्रहण शपथ घेतली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भीमलिंग लिंभारे व संजय श्राॅफ यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी युसूफ इंजिनिअरिंग कल्याणसिंग जोधा, शिवनंदन राजपूत, जितेंद्र गिरासे, प्रा. डॉ. प्रकाश अहिरराव, चंद्रकला सिसोदिया, संदीप सराफ, हेमंत वंजारी, शशी राजपूत, अजीम खान, आदींनी परिश्रम घेतले.

अध्यक्षीय भाषणात विजयकुमार चौधरी यांनी- जायंट्सचा अर्थ, सदस्यांची कर्तव्ये, जबाबदाऱ्या, वर्षभरात ग्रुपने राबवायचे प्रोजेक्ट, आदींची माहिती दिली.

Web Title: Dondaicha: Giants family (club) inauguration ceremony in excitement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.