दोंडाईचा येथे १ हजार ३१७ दहावीचे विद्यार्थी परीक्षेविना पोहोचणार वरच्या इयत्तेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:32 IST2021-04-26T04:32:45+5:302021-04-26T04:32:45+5:30

इंग्रजी माध्यमासह मराठी माध्यमाच्या हुशार विद्यार्थ्यांनी दहावी वर्गाबाबत घेतलेल्या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. ऑनलाइन शिकवणी व ऑनलाइन ...

At Dondaicha, 1,317 10th standard students will reach the upper class without examination | दोंडाईचा येथे १ हजार ३१७ दहावीचे विद्यार्थी परीक्षेविना पोहोचणार वरच्या इयत्तेत

दोंडाईचा येथे १ हजार ३१७ दहावीचे विद्यार्थी परीक्षेविना पोहोचणार वरच्या इयत्तेत

इंग्रजी माध्यमासह मराठी माध्यमाच्या हुशार विद्यार्थ्यांनी दहावी वर्गाबाबत घेतलेल्या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. ऑनलाइन शिकवणी व ऑनलाइन वर्ग अटेंड करून फायदा झाला नसून, अभ्यासक्रमाचे मूल्यमापन होणे गरजेचे म्हटले आहे.

1: विरपाल गिरासे-पालक : वाढत्या कोरोनामुळे दहावीचा विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता, पुढील वर्गात प्रवेश मिळणार असल्याचा निर्णय योग्य आहे, परंतु मुलगा सलग चार-पाच तास अभ्यास करीत असतानाच, त्याच्या अभ्यासाचे मूल्यमापन होणार नाही, तरीही आताची परिस्थितीत जीव महत्त्वाचा आहे.

2: संगीता पाटील - पालक : मुलीने ऑनलाइन वर्गांसह, खासगी ऑनलाइन शिकवणी वर्गातून अभ्यास केला. मागील वर्षाचे प्रश्नसंचही सोडविले होते. पुढील शिक्षणाचे नियोजनही झाले होते. आता अंतर्गत मूल्यमापनाने पास केले जाणार आहे. कोरोना असला, तरी वेगळे नियोजन करून परीक्षा होणे गरजेचे होते. महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयाचे स्वागतही करतो.

3:विनोद माळी : विद्यार्थी - कोरोनाचा संसर्ग बघता, शासनाने घेतलेला निर्णय योग्य आहे. माझ्यासारख्या अनेक गरीब मुलांकडे शालेय व्हिडीओ बघण्यासाठी मोबाइल नाही. आमचा संपूर्ण अभ्यास झाला नव्हता.

Web Title: At Dondaicha, 1,317 10th standard students will reach the upper class without examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.