शिंदखेडा रोटरीतर्फे डॉक्टरांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 17:16 IST2020-07-11T17:16:08+5:302020-07-11T17:16:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिंदखेडा :रोटरी क्लब आॅफ शिंदखेडाच्यावतीने कोविड-१९ या वैश्विक महामारीच्या वातावरणात नागरिकांना वेगवेगळ्या सुविधा देणाऱ्या कोरोना योद्धांचा ...

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
शिंदखेडा :रोटरी क्लब आॅफ शिंदखेडाच्यावतीने कोविड-१९ या वैश्विक महामारीच्या वातावरणात नागरिकांना वेगवेगळ्या सुविधा देणाऱ्या कोरोना योद्धांचा सत्कार करण्यात आला.
रोटरीचे अध्यक्ष भागचंद जैन यांनी स्टेट बॅँकेचे अमितकुमार गुप्ता, पी. टी. परदेशी यांना गुलाब पुष्प दिले.
तसेच ‘डॉक्टर्स डे’ निमित्त वैद्यकीय सेवा देणाºया डॉक्टरांचा सत्कार डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.देवेंद्र पाटील, डॉ. सुजय पवार, डॉ. पवन पाटील, डॉ. गिरासे, डॉ. फुलंब्रीकर व इतर डॉक्टरांचा पोलीस सब इन्स्पेक्टर सुशांत वळवी यांच्या हस्ते सत्कार कणण्यात आला. शहरातील कर सल्लागार नितीन सोनार यांचाही सत्कार केला. उमेश गिरासे यांचा अन्नदाता म्हणून सन्मान करण्यात आला.
यावळी प्रोजेक्ट चेअरमन संदीप सोनार, सचिव विजय जाधव, म्बाळकृष्ण बोरसे, संजय पारख, गोपालसिंग परमार, संजयकुमार महाजन यांच्यासह अनेकजण मोठ्या संख्येने उपस्थित होते.