बळसाणे गावात डॉक्टर आपल्या दारी उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:35 IST2021-04-18T04:35:41+5:302021-04-18T04:35:41+5:30
सदर अभियान प्रारंभ करताना आरोग्य विभागाचे पथक घरोघरी जाऊन नागरिकांची थर्मल स्क्रीनिंग करत आहेत. बुधवारी दिवसभरात साधारणतः एक हजार ...

बळसाणे गावात डॉक्टर आपल्या दारी उपक्रम
सदर अभियान प्रारंभ करताना आरोग्य विभागाचे पथक घरोघरी जाऊन नागरिकांची थर्मल स्क्रीनिंग करत आहेत. बुधवारी दिवसभरात साधारणतः एक हजार नागरिकांची थर्मल स्क्रीनिंग, ऑक्सिजन अशा नाना तऱ्हेच्या आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. यापैकी किरकोळ आजार वगळता कुणालाही ताप, सर्दी, खोकला यासारखे कोरोनासदृश्य लक्षणे आढळून आले नाही, असे आरोग्य पथकांनी सांगितले.
बळसाणे गावात हल्ली कोविडचा रुग्ण आढळला नाही. कोरोनाचा शिरकाव गावात होऊ नये म्हणून, येथील उपसरपंच महावीर जैन यांनी सांगितले की, गावात मोलमजुरी करणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने आणि सध्याच्या परिस्थितीत गावात आर्थिक संकटाने मारले आहे. गरीब लोक अक्षरशः पैशांअभावी दुखणे अंगावर काढताना दिसून येत आहे. म्हणून आपण डॉक्टर आपल्या दारी हा उपक्रम राबवयाचा असल्याने मला आरोग्य पथकाची तातडीची गरज असल्याचे जैन यांनी नमूद केले होते.
गावात सर्दी, ताप व खोकल्याचे रुग्ण आढळून आल्यास त्यांची नोंद करण्यात येईल. याप्रसंगी डॉ. किरण वाघ यांनी रुग्णांची तपासणी केली. येथील रुग्णांना ग्रामपंचायतमार्फत विनामूल्य औषध आशा सेविका व प्राथमिक शाळेचे शिक्षक यांच्यामार्फत वाटप करण्यात आले. गावात डॉक्टर आपल्या दारी या उपक्रमाचे कौतुक होत आहे. यावेळी लोकनियुक्त सरपंच दरबारसिंग गिरासे, उपसरपंच महावीर जैन तसेच ग्रा.पं.सदस्य सुदाम खांडेकर , देवीदास धनुरे , प्रा. भुषण हालोरे , बापू माळचे , रावसाहेब हालोरे उपस्थित होते.