पाणी पिताय ना; मग काळजी घ्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:43 IST2021-09-09T04:43:43+5:302021-09-09T04:43:43+5:30
धुळे : दुषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांची संख्या खुप मोठी आहे. तरिही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होण्यासह ...

पाणी पिताय ना; मग काळजी घ्या!
धुळे : दुषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांची संख्या खुप मोठी आहे. तरिही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होण्यासह दवाखान्याचा खर्चही वाढतो. धुळे शहरात काही भागात आठ दिवसाआड तर काही भागात पाच दिवसाआड पाणीपुरवठा होतो. नागरिक पाणी साठवून ठेवतात. साठवलेल्या पाण्यात जंतु आढळून येतात. पाणी दुषित होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे किमान पावसाळ्यात तरी पाणी उकळून प्यायलेले कधीही आरोग्यासाठी योग्य असते. उकळून थंड केलेले पाणी प्यायल्याने आजारांचा धोका टळतो, असा सल्ला डाॅक्टर नेहमीच देतात.
दुषित पाण्यामुळे होणारे आजार
पावसाळ्यात ठिकठिकाणी साचलेले दुषित पाणी जलाशयांमध्ये वाहून येते.
जलस्त्रोत तसेच जलवाहिन्यांमधील पाणी देखील दुषित होते.
त्यामुळे डायरिया, काॅलरा, वाताचे विकार होतात.
तसेच सर्दी, खोकला, ताप यांसारखे व्हायरल आजारही पसरतात.
काविळ, गॅस्ट्रो, लेप्टोस्पायरोसिस होण्याचीही शक्यता असते.
पाणी उकळून प्यायलेले बरे
पावसाळ्यात दुषित पाण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे आजार बळावतात. म्हणून पाणी उकळूनच प्यायलेले बरे असते. जिल्ह्यात १३ जलस्त्रोत दुषित आढळून आले आहेत.
आजाराची लक्षणे
दुषित पाणी प्यायल्याने एक किंवा त्यापेक्षा अधिक वेळा पातळ शाैचास होण्याचा विकार जडू शकतो. त्यास अतिसार म्हणतात.
पोलिओ, विषमज्वर यासारखे आजारही दुषित पाण्यामुळे होण्याची शक्यता असते.
उलटी किंवा जुलाब यासारखी लक्षणेही दुषित पाण्यातून दिसून येतात. त्यास गॅस्ट्रो म्हणतात. दुषित पाणी घातक आहे.
धुळेकराना मिळते शुध्द पाणी, पण...
धुळेकरांना दररोज शुध्द पाणी मिळत असल्याचा दावा पालिकेने केला आहे. नियमीत होणाऱ्या नमुने तपासणीत शहरात एकही नमुना दुषित आढळून आला नाही. परंतु जलवाहिन्या फुटल्याने त्यात दुषित पाणी जाते आणि त्यातून दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होऊ शकतो. अशावेळी नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. काही वेळा दुषित पाणीपुरवठ्याच्या तक्रारी असतात.