जिल्ह्यात गालबोट लागू देऊ नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2019 12:12 PM2019-11-08T12:12:07+5:302019-11-08T12:13:46+5:30

सुभाष भामरे : राम जन्मभूमी प्रकरणाच्या निकालाच्या अनुषंगाने सतर्कतेच्या सूचना

Do not apply gallot in the district | जिल्ह्यात गालबोट लागू देऊ नका

dhule

Next

धुळे : येत्या काही दिवसात राम जन्म भूमी प्रकरणाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात बैठक घेतली़ त्यात पोलिसांनी सतर्क राहण्याच्या सूचना करत शहरासह जिल्ह्यात कुठेही गालबोट लागू देवू नका असेही आवाहन बैठकीतून केले़
अयोध्या येथील राम जन्मभूमी प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाकडून येत्या काही दिवसात अपेक्षित आहे. या निकालाच्या पार्श्वभूमीवर शहरातील शांतता बिघडू नये व कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या हेतूने खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी धुळे जिल्हा पोलीस दलाची बैठक घेतली़ या बैठकीत राम जन्मभूमी प्रकरणाच्या सर्वोच न्यायालयाच्या निकालानंतर जिल्ह्यात शांतता टिकून रहावी म्हणून पोलीस दलाने करावयाच्या उपायोजनांच्या योजना संदर्भात चर्चा केली़ तसेच संबंधित इतर सर्व विषयांवर ही सविस्तर चर्चा करुन सूचनाही दिल्या़
खासदार डॉ. भामरे यांनी या प्रसंगी जिल्ह्यातील जनतेने देखील शांतता राखण्यास मदत करावी व कोणतीही अनुचित घटना घडणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन केले.
या बैठकीत, अपर पोलीस अधीक्षक डॉ़ राजू भुजबळ यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी यांच्यासह महापौर चंद्रकांत सोनार, भारतीय जनता पार्टीचे धुळे तालुका अध्यक्ष देवेंद्र पाटील, रामकृष्ण खलाणे, नगरसेवक हिरामण गवळी, नगरसेवक सुनील बैसाणे, प्रवीण अग्रवाल, संजय मोरे, प्रदीप पानपाटील, रोहित चांदोडे आदी उपस्थित होते.

Web Title: Do not apply gallot in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे