शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

पाड्यावरील बालकांना कपडे देवून दिवाळी केली ‘गोड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2020 10:32 PM

धुळे :सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरू झाली आहे. बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. तिकडे सातपुड्याच्या कुशीतील काही आदिवासी पाड्यांवर मात्र ...

धुळे :सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरू झाली आहे. बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. तिकडे सातपुड्याच्या कुशीतील काही आदिवासी पाड्यांवर मात्र दिवाळीचा काहीही उत्साह दिसून येत नाही. तेथील बालकांच्या अंगावर पुरेसे कपडे देखील नाहीत. शिरपूर तालुक्यातील अशाच काही पाड्यांवरील बालकांना शहरातील यंग फाउंडेशनतर्फे कपड्यांचे वाटप करण्यात आले.    यंग फाउंडेशनच्या टीमने शिरपूर तालुक्यातील गुऱ्हाडपाणी व जवळच्या पाड्यावरील ५०० बालकांना कपड्यांचे वाटप केले. चित्रपट दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांनी या पाड्यांवरील बालकांसाठी कपडे पाठविले होते. यंग फाउंडेशनने या पाड्यांवरील विदारक परिस्थिती उजेडात आणल्यानंतर दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांनी गुऱ्हाडपाणी पाड्याला भेट दिली होती. पुण्यात परत गेल्यावर त्यांनी लहान बालकांसाठी कपडे दान करावेत, असे आवाहन केले होते. पुणेकरांनी त्यांच्या आवाहनास भरभरुन प्रतिसाद दिला. व कपडे जमा केले. तेथून यंग फाउंडेशनकडे ते पाठवण्यात आले. त्यानंतर  फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी ते कपडे लहान बालकांपर्यंत पोहचविले. प्रांताधिकारी विक्रमसिंग बादल यांच्याहस्ते कपड्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी संदीप देवरे, प्रकाश पाटील, कुणाल देवरे, दिव्या पाटील, चैताली वाणी, स्वप्नील पाटील, चेतन उपाध्याय, रोहित येवले, राजेंद्र पावरा, सुरेश पावराव मंजुषा पावरा आदी उपस्थित होते.  

टॅग्स :Dhuleधुळे