Divya Sakhi Award to Kavita Pawar | कविता पवार यांना दिव्यांग सखी पुरस्कार
Dhule

धुळे : ६० व्या जागतिक दिव्यांग दिनाचे औचीत्य साधून प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या शहराध्यक्षा अ‍ॅड़ कविता पवार यांना स्वरूपा पाटील यांच्या हस्ते दिव्यांग सखी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले़
अपंग पुनर्वसन व आर्थिक सहाय्य संस्था संचलित श्रीमती मायाबाई बचाराम बजाज अपंग वसतीगृह तसेच तीर्थराज अपंग कल्याण व पुनर्वसन संस्थेतर्फे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळे येथील कल्पवृक्ष गार्डन येथे ८ डिसेंबर रोजी ६० व्या जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग सखी पुस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते़
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी स्वरूपा पाटील यांच्याहस्ते प्रहार अपंग क्रांती संस्थेच्या शहराध्यक्षा तथा यशवंत अपंग संस्थेच्या अध्यक्षा अ‍ॅड कविता एस. पवार यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला़
यावेळी शिंदखेडा तालुका प्रहार संघटनेच्या अध्यक्षा कल्पना सोनार, संस्थेचे अध्यक्ष ए.डी. पाटील महावीर मगदूम, सचिव संजय चौगुले, शांतीनाथ पाटील सुहास मंडाले उपस्थित होते़ सूत्रसंचालन अंजली गायकवाड यांनी केले. तर आभार महावीर मगदूम यांनी मानले़

Web Title: Divya Sakhi Award to Kavita Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.