धुळे : जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेसह रमाई, शबरी, पारधी अशा विविध घरकुल योजनांतर्गत २ हजार ८५५ घरकुलांचे कामे पूर्ण करीत धुळे जिल्ह्याने राज्यात तृतीय क्रमांक मिळविला आहे़ उत्कृष्ट कार्याबद्दल शासनाकडून जिल्हास १० पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे़जागतिक आवास दिनानिमित्त मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात आवास योजना ग्रामीण भागातील प्रभावी अंमलबजावणी करणाºया जिल्ह्याचा सन्मान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुरस्कार देऊन करण्यात आला़जिल्ह्याला मिळालेले पुरस्कारकेंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्यस्तरीय रमाई, शबरी व पारधी योजनेंतर्गंत प्रथम टप्प्यात ८२.२ टक्के घरकुले पुर्ण केल्याने राज्यात तृतीय क्रमांक मिळविला़ तर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्यस्तरीय रमाई, शबरी व पारधी योजनेंतर्गंत प्रथम टप्प्यात ८२.९ टक्के घरकुले पूर्ण करुन नाशिक विभागात प्रथम तसेच प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गंत ४० हजार १६४ घरकुल पात्र लाभार्थ्यांचे बँक खाते पडताळणी पूर्ण करुन राज्यात तृतीय क्रमांक मिळाला आहे़ असे १० पुरस्कारात जिल्ह्याला ४, साक्री तालुका ३ तर शिरपूर ३ पुरस्कारांचा समावेश आहे़आदिवासी विभाग प्रथमराज्यपुरस्कृत अदिवासी विकास विभागाच्या आवास योजनेंतर्गंत प्रथम टप्प्यात आजअखेर जिल्ह्यात २ हजार ८५५ घरकुले पूर्ण करुन राज्यामध्ये तृतीय क्रमांक मिळविण्यात यश मिळाले आहे़शिरपूर व साक्री अव्वलशिरपूर : आवास योजनेत घरकुले पूर्ण करून राज्यात प्रथम क्रमांक,पंतप्रधान योजनेत घरकुले पूर्ण करून राज्यात द्वितीय क्रमांक अदिवासी विकास विभागाच्या आवास योजनेंतर्गंत घरकुले पूर्ण करुन द्वितीय क्रमांक, रमाई, शबरी व पारधी योजनेंतर्गत पारितोषिक मिळाले.साक्री : केंद्र व राज्य पुरस्कृत आवास योजनेत घरकुले पूर्ण करून राज्यात द्वितीय क्रमांक, ग्रामीण अंतर्गत घरकुले पूर्ण करून राज्यात चौथा क्रमांक, अदिवासी विकास विभागाच्या आवास योजनेंतर्गत घरकुले पूर्ण करून प्रथम क्रमांक मिळवला आहे. राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता, अदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव, धनंजय माळी उपस्थित होते. यावेळी बी. एम.मोहन, वाय. डी. शिंदे, एस. जी. शिवदे, जगन सुर्यवंशी, राघवेंद्र घोरपडे आदी पुरस्कार स्विकारला़
जिल्हा अव्वल; शहरात योजनांना ‘घरघर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 22:56 IST