जिल्हा निवड चाचणी कबड्डी स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:36 IST2021-02-16T04:36:32+5:302021-02-16T04:36:32+5:30
कांतीलाल चौधरी यांना आदर्श शिक्षक पुरस्कार धुळे : शहरातील रहिवासी कांतीलाल चौधरी हे प्राथमिक आश्रमशाळा वाळंबा ता.अक्कलकुवा येथे ...

जिल्हा निवड चाचणी कबड्डी स्पर्धा
कांतीलाल चौधरी यांना आदर्श शिक्षक पुरस्कार
धुळे : शहरातील रहिवासी कांतीलाल चौधरी हे प्राथमिक आश्रमशाळा वाळंबा ता.अक्कलकुवा येथे कार्यरत आहेत. त्यांना आदिवासी विकास संघ महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांचे सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ विद्यावाडीचे सर्व शिक्षक व संस्थेचे अध्यक्ष ॲड. सुधीर जाधव, सचिव प्रा.संजय जाधव यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
आकाश कुंदनाणी सी.ए.परीक्षेत यश
धुळे : शहरातील कुमारनगरात राहणारा आकाश सुरेश कुंदनाणी हा इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाैटंटस ऑफ इंडिया (आयसीएआय) द्वारा डिसेंबर २०२० मध्ये घेण्यात आलेल्या सी.ए. अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत उत्तीर्ण झाला आहे. तो महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमीचे माजी सदस्य तथा सिंधूरत्न इंग्लिश स्कूलचे चेअरमन सुरेश कुंदनाणी यांचा मुलगा आहे. त्याला सिंधुरत्नचे अध्यक्ष तनुकुमार दुसेजा, सिंधी जनरल पंचायतचे अध्यक्ष गुलशन उदासी यांनी शुभेच्छा दिल्या.