जिल्हा ग्रंथालयाची कार्यकारिणी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 12:16 IST2020-03-04T12:16:22+5:302020-03-04T12:16:59+5:30
वार्षिक सभा उत्साहात : जिल्हाध्यक्षपदी अनिल सोनवणे यांची निवड

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
जैताणे : धुळे जिल्हा ग्रंथालय संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा प्रमोद महाजन यांच्या उपस्थितीत सार्वजनिक वाचनालय खुडाणे येथे घेण्यात आली. यावेळी जिल्हा ग्रंथालय संघाच्या अध्यक्षपदी जैताणे येथील महात्मा फुले सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष अनिल सोनवणे यांची निवड सवार्नुमते करण्यात आली.
सभेच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हाध्यक्ष आर.ओ. पाटील होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष अॅड. संभाजीराव पगारे, नाशिक विभाग ग्रंथालय संघाचे संचालक डॉ.प्रा.दत्ता परदेशी, बापू नेरकर, डॉ.निरंजन महाजन आदी उपस्थित होते.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डॉ.दत्ता परदेशी होते. २०२० ते २३ या तीन वर्षासाठी नवीन कार्यकारिणी अशी-जिल्हाध्यक्ष अनिल सोनवणे, उपाध्यक्ष युवराज बोरसे, प्रमुख कार्यवाह राहुल महिरे, कोषाध्यक्ष भरत रोकडे, सहकार्यवाह ज्ञानेश्वर माळी, तर संचालक अॅड.संभाजीराव पगारे, डॉ.दत्ता परदेशी, आर.ओ. पाटील, अविनाश भदाणे, रोहिदास हाके, बिपिनचंद्र नेरकर, हि.रा. चौधरी, महेंद्र जाधव, नरेंद्र महाजन, हरीश पाटील, नथुराम ठाकरे, नरेंद्र देवरे, राजकिरण राजपूत, पी.पी. महाले, गोविंद भाऊ कांबळे, सुरेश मोरे, कल्पना प्रमोद शेवाळे, कुमारी वैष्णवी प्रकाश बच्छाव यांची निवड करण्यात आली.
यावेळी दिवंगताना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सभेत ठराव व २०२०-२१चे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले ग्रंथपालन वर्गाचे जनजागृतीसह विविध विषयांवर चर्चा झाली. यावेळी जिल्ह्यातील वाचनालयांचे पदाधिकारी, कर्मचारी, संघाचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.